Ind Vs Eng T20 Live Update Score : फिरीकपटू आदील राशीदला पहिलं षटक देऊन इंग्लंडनं त्यांची रणनीती स्पष्ट केली होती. त्यात जोफ्रा आर्चरनं दुसऱ्याच षटकात टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलला ( KL Rahul) माघारी पाठवले. आर्चरच्या त्या षटकात कर्णधार विराट कोहलीलाही ( Virat Kohli) अवघड गेलं. त्यात तिसऱ्या षटकात राशीदच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो सोपा झेल देऊन माघारी परतला. भारताचे दोन फलंदाज ३ धावांवर बाद झाले. पण, त्यानंतर आलेल्या रिषभ पंतनं ( Rishabh Pant) सुरुवातीपासून फटकेबाजी केली. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) १४१ kmph च्या वेगानं टाकलेला चेंडू रिषभनं 'खतरनाक' फटका मारून रिव्हर्स फटक्यानं यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सीमापार पाठवला. ( Rishabh Pant has just reverse-lapped Jofra Archer). त्याचा हा फटका पाहून जोफ्रासह इंग्लंडच्या अन्य खेळाडूंनी तोंडात बोटं टाकलीच शिवाय भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याचीही दाद मिळवली. Ind Vs Eng 1st T20 Live Update Score
पाहा व्हिडीओ...
Posted by Swadesh Ghanekar on Friday, March 12, 2021
कसोटी मालिकेत जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर खतरनाक रिव्हर्स स्वीप
विराटच्या नावावर नकोसे विक्रम
- जून २०१८ नंतर खेळलेल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २६ डावांमध्ये विराट कोहली आज प्रथमच भोपळ्यावर माघारी परतला.
- ट्वेंटी-२० क्रिकेटमधील पहिल्या ८० डावांत सर्वाधिक ३ वेळा भोपळ्यावर माघारी परतण्याच्या इयॉन मॉर्गनच्या विक्रमाशी विराट कोहलीनं बरोबरी केली. महेंद्रसिंग धोनी, शोएब मलिक प्रत्येकी १ वेळा भोपळ्यावर बाद झाले होते.
- २०२१ मध्ये सर्वाधिक ३ वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रमही विराटनं नावावर केला. जॉनी बेअरस्टो, कुसल मेंडिस आणि अॅनरिच नॉर्टझे हेही तीन वेळा भोपळ्यावर बाद झाले आहेत.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद होण्याची विराटची पहिलीच वेळ ठरली.