Join us

शमीच्या कामावर 'फोकस'! 'सूर्या'ची टीम इंडिया आजपासून इंग्लंडला भिडणार, कुठे पाहाल सामने?

Ind vs Eng 1st T20 : २२ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान रंगणार पाच सामन्यांची टी२० मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 08:09 IST

Open in App

Mohammad Shami Team India, Ind vs Eng 1st T20 : कोलकाता: फिट होऊन वर्षभरानंतर संघात परतलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कसे पुनरागमन करतो यावर चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. भारत-इंग्लंड यांच्यात धाव सामन्यांच्या टी-२० मालिकेला आज बुधवारी ऐतिहासिक ईडन गार्डनवर सुरुवात होत आहे. सायंकाळी ७ वाजेपासून हा सामना रंगणार आहे. भारताचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे झालेली जखम भरून काढणे हे असेल. टी-२० मालिकेनंतर उभय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकादेखील खेळणार असून १९ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीआधी आपली ताकद तपासून पाहण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार आहे.

२०२३च्या वनडे विश्वचषकात सुरुवातीला चार सामन्यांना मुकल्यानंतरही शमीने सर्वाधिक २४ बळी घेतले. वानखेडेवर न्यूझीलंडविरुद्ध त्याने ५७ धावांत ७ फलंदाज बाद केले. टी-२० मध्ये त्याचे केवळ २४ बळी आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल खेळल्यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे शमी बाहेर होता. दरम्यान, त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठदुखीमुळे बाहेर असल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शमीवर संघाची भिस्त असेल. शमीने अखेरचा टी-२० सामना २०२२ ला इंग्लंडविरुद्धच खेळला होता.

अक्षर पटेल हा उपकर्णधार आहे. त्याने विद्रीजमधील टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. अक्षरने फायनलमध्ये ३१ बैद्भुत ४७ धावा केल्या, आठ सामन्यांत त्याने नऊ गडी बाद केले होते.

'बझबॉल'चा अवलंब

जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाची मुख्य प्रशिक्षक बैंडन मॅक्युलम यांच्यासोबत ही नव्या सत्राची सुरुवात असेल. टी-२० विश्वचषकातून लवकर बाहेर पडल्यानंतर मॅथ्यू मोट यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मॅक्युलमने तीन वर्षाचा करार केला. 'बझबॉल' क्रिकेटची नवी व्याख्या लिहिणारे मॅक्युलम झटपट प्रकारातही आपली आक्रमक फटकेबाजीची रणनीती कायम ठेवू इच्छितात. रीस टॉपले, सॅम करन आणि विल जैक हे संधात नाहीत. २१ वर्षाचा जेकब बेथेल याने आतापर्यंत सात टी-२० सामन्यात १६७ च्या स्ट्राइक रेटने धावा काढल्या आहेत. जोफ्रन आर्चर हादेखील शमीसारखा जखमेवर मात करीत पुनरागमनास उत्सुक दिसतो. सायंकाळी पडणाऱ्या दवबिंदूंमुळे 'ईडन'वर रात्रीच्या वेळी वेगवान गोलंदाजांना त्रास होऊ शकतो.

१४ - वर्षांपासून इंग्लंडने भारतात टी-२० मालिका जिंकलेली नाही. या प्रकारात पाहुण्यांनी २०११ ला अखेरची मालिका जिंकली होती. दोन्ही संघांनी भारतात ११ टी-२० सामने खेळले असून, भारताने सहा, तर इंगलंडने ७ सामने जिंकले.

२००७ - पासून भारत-इंगलंड यांच्यात २४ टी-२० सामने झाले. भारताने १३ आणि इंग्लंडने ११ सामने जिंकले भारत-इंग्लंड यांच्यात २०१४ पर्यंत चार मालिका झाल्या. त्यात इंग्लंडने तीन मालिका जिंकल्या तर एक मालिका अनिर्णीत राहिली. २०१७ ते २०२१ या कालावधीत पुन्हा चार मालिका झाल्या. या चारही मालिका भारताने जिंकल्या. त्यातही दोनदा इंग्लंडला त्यांच्या मैदानावर पराभूत केले. दोन्हीं संघांनी भारतात ११ टी-२० सामने खेळले असून, भारताने सहा, तर इंग्लंडने ५ सामने जिंकले आहेत.

चॅम्पियन्स टॉफीसाठी संघात स्थान न मिळालेल्या संजू सैमसनवर दमदार कामगिरी करण्याचे दडपण असेल. मध्य प्रदेशविरुद्ध रणजी सामन्यासाठीही केरळने त्याला वगळले आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलचोर्न कसोटीत शतक ठोकणाऱ्या नितीश कुमार रेड्डी याला स्थान देण्यात आले. तो हार्दिकसोबत वेगवान मान्यासाठी चांगला पर्याय ठरू शकेल.

  • सामना : सायंकाळी ७ पासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस
  • लाइव्ह स्ट्रीमिंग : हॉटस्टार
टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५मोहम्मद शामीसूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघइंग्लंडअक्षर पटेल