Ind vs Eng 1st T20 : टीम इंडियापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ चांगला; इंग्लंडच्या माजी कर्णधारानं उडवली खिल्ली, वासिम जाफरचं भारी उत्तर

Ind vs Eng 1st T20 : Michael Vaughan got epic reply from wasim jaffer कसोटी मालिकेतील दमदार विजयानंतर ट्वेंटी-20 मालिकेत मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 08:15 AM2021-03-13T08:15:00+5:302021-03-13T12:23:48+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 1st T20 : The Mumbai Indians are a better T20 team than Team Indian, Michael Vaughan got epic reply from wasim jaffer  | Ind vs Eng 1st T20 : टीम इंडियापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ चांगला; इंग्लंडच्या माजी कर्णधारानं उडवली खिल्ली, वासिम जाफरचं भारी उत्तर

Ind vs Eng 1st T20 : टीम इंडियापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ चांगला; इंग्लंडच्या माजी कर्णधारानं उडवली खिल्ली, वासिम जाफरचं भारी उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 1st T20 Live Update Score : ट्वेंटी-20 मालिकेत मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. रोहित शर्माला ( Rohit Sharma) विश्रांती देऊन नवी सलामीची जोडी मैदानावर उतरवण्याचा विराट कोहलीचा ( Virat Kohli) डाव फसला. श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) च्या ६७ धावांनी टीम इंडियानं समाधानकारक धावसंख्या उभारली. पण, इंग्लंडला नमवण्यासाठी ती अपूरी ठरली. भारतीय संघाच्या कामगिरीवर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Former England Captain Michael Vaughan ) यानं खिल्ली उडवली. यापेक्षा मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) संघ चांगला, असे ट्विट त्यानं केलं आणि भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर ( Wasim Jaffer) यानं सडेतोड उत्तर दिले. रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांचा अतरंगी शॉट; BCCI विचारतंय कोणाचा फटका सर्वाधिक भावला?, Video



इंग्लंडचा सहज विजय, मालिकेत १-०ने आघाडी
जेसन रॉय ( Jason Roy) आणि जोस बटलर ( Jos Buttler) यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी ८ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलनं ( Yuzvendra Chahal) यानं इंग्लंडला पहिला धक्का दिला अन् भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक ६० विकेट्स घेण्याचा मान पटकावला. त्यानं जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला. पण, इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला गेला होता. जेसन रॉयनं ३२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. डेवीड मलान २४, तर जॉनी बेअरस्टो २६ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडनं ८ विकेट्स व २७ चेंडू राखून सामना जिंकला.  रिषभ पंतचा 'खतरनाक' शॉट; युवराज सिंग म्हणतो, ही जनरेशन बिनधास्त, निर्भय... Video

२० षटकं खेळून भारताची आजची धावसंख्या ही तिसरी निचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८ बाद ११८ आणि २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध ९ बाद १२० धावा केल्या होत्या. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ४७५ इनिंगमध्ये सलग दोनवेळा शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांत विराटनं चौथं स्थान पटकावलं. सचिन तेंडुलकर ( ३४), वीरेंद्र सेहवाग ( ३१), सौरव गांगुली २९, विराट ( २८) आणि युवराज सिंग ( २६) असे टॉप फाईव्ह फलंदाज आहेत. श्रेयस अय्यरनं रोहित शर्माच्या ११ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी, विराटच्या नावावर नकोसा पराक्रम

Web Title: Ind vs Eng 1st T20 : The Mumbai Indians are a better T20 team than Team Indian, Michael Vaughan got epic reply from wasim jaffer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.