Gautam Gambhir Kalighat Temple, Ind vs Eng 1st T20 : भारतीय संघ उद्यापासून इंग्लंडविरूद्ध पाच टी२० सामन्यांची मालिकाा खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना कोलकातामध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने एक दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. भारतीय संघातून कुणाल अंतिम ११ मध्ये स्थान मिळणार याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. पण त्याआधी भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची चर्चा आहे. त्याने आज कोलकातामधील कालीघाट मंदिरात हजेरी लावली.
प्रशिक्षक गौतम गंभीरने कोलकाता येथील जगप्रसिद्ध कालीघाट मंदिराला भेट दिली. यावेळी बीसीसीआयचे काही कर्मचारीही त्यांच्यासोबत होते. कालीघाट मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. गंभीरची देवीवार नितांत श्रद्धा आहे. तो जेव्हा कोलकात्याला येतो तेव्हा कालीघाट मंदिरात जातो. यावेळीही गंभीर इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी कोलकात्यात आहे. त्यावेळी त्याने कालीघाट मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले.
पहिल्या टी२० साठी इंग्लंडचा संघ जाहीर
पहिल्या टी२० साठी इंग्लंडने एक दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. बेन डकेट, फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल हे पाच फलंदाज संघात असणार आहेत. लियम लिव्हिंगस्टन आणि जेमी ओव्हरटर्न या दोन अष्टपैलूंचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी गस अटकिन्सन, जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्यावर आहे. तर अनुभवी फिरकीपटू आदिल रशीद यालाही संघात स्थान दिले गेले आहे.