Ind Vs Eng 1st T20 Live Update Score : कसोटी मालिकेतील दमदार विजयानंतर ट्वेंटी-20 मालिकेत मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. रोहित शर्माला ( Rohit Sharma) विश्रांती देऊन नवी सलामीची जोडी मैदानावर उतरवण्याचा विराट कोहलीचा ( Virat Kohli) डाव फसला. शिखर धवन, लोकेश राहुल व विराट कोहली हे तिघेही फलकावर २० धावा असताना माघारी परतले. विराट ( Virat) आदिल राशिदच्या गोलंदाजीवर शून्यावर झेलबाद होऊन माघारी परतला. उत्तराखंड पोलिसांनी मग विराटला ट्रोल करताना लोकांना महत्त्वाचा संदेश दिला. ( Uttarakhand police trolled Virat Kohli )
विराट कोहलीच्या नावावर नकोसे विक्रम
- विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ४७५ इनिंगमध्ये सलग दोनवेळा शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांत विराटनं चौथं स्थान पटकावलं. सचिन तेंडुलकर ( ३४), वीरेंद्र सेहवाग ( ३१), सौरव गांगुली २९, विराट ( २८) आणि युवराज सिंग ( २६) असे टॉप फाईव्ह फलंदाज आहेत. रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांचा अतरंगी शॉट; BCCI विचारतंय कोणाचा फटका सर्वाधिक भावला?, Video Ind Vs Eng 1st T20,
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर सर्वाधिकवेळा बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांत विराटनं सौरव गांगुलीला मागे टाकले. विराट १४ वेळा, तर गांगुली १३ वेळा कर्णधार म्हणून शून्यावर बाद झाला आहे. Ind Vs Eng 1st T20 Live Match रिषभ पंतचा 'खतरनाक' शॉट; युवराज सिंग म्हणतो, ही जनरेशन बिनधास्त, निर्भय... Video
- जून २०१८ नंतर खेळलेल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २६ डावांमध्ये विराट कोहली आज प्रथमच भोपळ्यावर माघारी परतला.
- ट्वेंटी-२० क्रिकेटमधील पहिल्या ८० डावांत सर्वाधिक ३ वेळा भोपळ्यावर माघारी परतण्याच्या इयॉन मॉर्गनच्या विक्रमाशी विराट कोहलीनं बरोबरी केली. महेंद्रसिंग धोनी, शोएब मलिक प्रत्येकी १ वेळा भोपळ्यावर बाद झाले होते.
- २०२१ मध्ये सर्वाधिक ३ वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रमही विराटनं नावावर केला. जॉनी बेअरस्टो, कुसल मेंडिस आणि अॅनरिच नॉर्टझे हेही तीन वेळा भोपळ्यावर बाद झाले आहेत. श्रेयस अय्यरनं रोहित शर्माच्या ११ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद होण्याची विराटची पहिलीच वेळ ठरली.
उत्तराखंड पोलिसांनी घेतली फिरकी
हेल्मेट घालणंच पुरेसं नाही, तर शुद्धीत राहुल गाडी चालवणेही तितकेच गरजेचं आहे. नाहीतर विराट कोहली सारखं तुम्हीपण शून्यावर बाद होऊ शकता.
Web Title: Ind vs Eng 1st T20 : Uttarakhand police trolled Virat Kohli on he got out zero, tweet goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.