Ind Vs Eng T20 Live Update Score : कसोटी मालिकेतील यशानंतर भारतीय संघ ट्वेंटी-20 मालिकेतही इंग्लंडला आपला दम दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेत उतरलेला भारतीय संघ आणि ट्वेंटी-20 मालिकेतील संघ यांच्यात बराच बदल असल्यानं या संघाचा सामना करायचा तरी कसा, हा प्रश्न इंग्लंडच्या संघाला पडला आहे. पण, आजच्या सामन्यात अंतिम ११ खेळाडू निवडताना कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचाही कस लागणार आहे.
सलामीला तो रोहित शर्मा ( Rohit Sharma) सोबत कोणाला संधी देतो, याची उत्सुकता आहे. पण, मॅचच्या आधीच विराटनं रोहितसोबत पहिल्या ट्वेंटी-20 ( Ind vs Eng T20 Live Match Today) साठी सलामीला रोहितसोबत लोकेश राहुल ( Ind vs Eng 1st T20 – Rohit Sharma, KL Rahul to open Indian innings) मैदानावर उतरणार असल्याचे स्पष्ट केले. शिखर धवन ( Shikhar Dhawan) तिसरा सलामीवीर म्हणून असेल.
''तीनही सलामीवीरांना अंतिम ११मध्ये खेळवू शकत नाही. शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यापैकी एकालाच संधी मिळेल. राहुल ( KL Rahul) आणि रोहित ( Rohir Sharma) हे सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे. तेच आजच्या सामन्यात सुरुवात करतील. रोहितनं विश्रांतीचा निर्णय घेतला किंवा लोकेशला दुखापत झाली किंवा आणखी काही, तर शिखर धवनला नक्कीच संधी मिळे,''असे विराटनं स्पष्ट केलं. विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीकडून धवननं १५०+ धावा केल्या आहेत.
विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यांचे नाव चर्चेत आहे. तर पाचव्या व सहाव्या क्रमांकावर रिषभ व हार्दिक पांड्या हे खेळतील. कर्नाटकचा फलंदाज राहुलसमोर मुंबईच्या अय्यर व यादवचे आव्हान आहे. अशात या तिघांपैकी केवळ एकच जण अंतिम ११मध्ये स्थान पटकावू शकतो.
भारत ( India’s T20I squad ) - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर Ind Vs Eng T20, Ind Vs Eng T20 Live Score
Web Title: Ind vs Eng 1st T20 : Virat Kohli confirms, Rohit Sharma-KL Rahul to open against England
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.