India vs England, 1st Test Day 4 : बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) एका हातानं अफलातून झेल घेताना जसप्रीत बुमराहला माघारी जाण्यास भाग पाडले आणि टीम इंडियाच्या पहिल्या डावाला ३३७ धावांवर ब्रेक लागला. चेन्नई कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडनं पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाला फॉलोऑन न देता इंग्लंडचा संघ पुन्हा मैदानावर फलंदाजीला आला. त्यांना पहिल्याच चेंडूवर आर अश्विननं धक्का दिला आणि त्यानंतर इशांत शर्मानं दुसरी विकेट घेतली. ड्रिंक्स ब्रेकपर्यंत इंग्लंडनं ३ बाद ६४ धावा करत ३०५ धावांची आघाडी घेतली आहे. ११४ वर्षांत जे कुणालाच जमलं नाही ते आर अश्विननं केलं, विराटही लागला नाचू Video
पाहा व्हिडीओ
दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रिषभ पंत ( Rishabh Pant) व चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आले. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खंबीरपणे सामना करताना टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. रिषभनं ८८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह ९१ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा १४३ चेंडूंत ७३ धावा करून माघारी परतला. पुजारा व रिषभ यांनी ११९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर व आर अश्विन या जोडीनं इंग्लडच्या गोलंदाजांचा सामना केला. या दोघांनी ८० धावांची भागीदारी केली आणि सुंदरनं खणखणीत अर्धशतक झळकावले. २० वर्षांनतर टीम इंडियाच्या बाबतीत घडली 'ही' अजब घटना; तुम्हालाही वाटेल आश्चर्य