IND vs ENG 1st Test Live Updates Day 3 ( Marathi News ) - इंग्लंडची दुसऱ्या डावात सकारात्मक सुरुवात पाहायला मिळतेय. बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु आर अश्विनने ही जोडी तोडली. डकेट व ऑली पोप जोडी वरचढ ठरताना दिसली. भारताला डकेटची विकेट मिळवण्याची संधी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मिळवून दिली होती. पण, त्याने रोहित शर्मा व यष्टिरक्षक केएस भरतचं ऐकलं आणि भारताला फटका बसला. स्टेडियमवर जेव्हा त्या प्रसंगाचा व्हिडीओ दाखलला गेला तेव्हा बुमराहला संताप अनावर झाला, पण...
रवींद्र जडेजाचे शतक चुकीच्या निर्णयामुळे हुकलं? Out or Not Out यावरून वातावरण तापलं, Video
इंग्लंडच्या पहिल्या डावातील २४६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४३६ धावा करून १९० धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात करून देताना ७४ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ८० धावा चोपल्या. लोकेश राहुलने १२३ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ८६ धावांची खेळी केली. श्रीकर भरतने ८१ चेंडूंत ४१ धावांची परिपक्व खेळी करून दाखवली. रवींद्र जडेजा व अक्षर पटेल यांनी ७८ धावांची भागीदारी केली. जडेजा १८० चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८७ धावांवर बाद झाला. अक्षर पटेल ४४ धावांनी माघारी परतला.
इंग्लंडने दुसऱ्या डावात सुरुवातीची काही षटके संयमी खेळ केल्यानंतर बॅझबॉल स्टाईल अमलात आणली. झॅक क्रॉलीने ३३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३१ धावा केल्या, परंतु आऱ अश्विनने त्याला माघारी पाठवले. बेन डकेट व ऑली पोप यांनी ७च्या सरासरीने धावा चोपल्या आणि तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत १५ षटकांत १ बाद ८९ धावा उभ्या केल्या होत्या. डकेटने चांगला खेळ करताना वेगाने इंग्लंडला शतकीपार नेले. १७व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने टाकलेला इनस्विंग चेंडू डकेटच्या पॅडवर आदळला.बुमराहने जोरदार अपील केले, परंतु मैदानावरील अम्पायरने त्याला नाबाद दिले. रोहित व भरत यष्टिंमागून चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर जात असल्याचे बुमराहला सांगत होते. त्यामुळे DRS न घेण्याचा निर्णय झाला. पण, जेव्हा रिप्ले पाहिलं गेलं तेव्हा चेंडू लेग स्टम्पवर आदळत असल्याचे दिसले आणि बुमराहने नाराजी व्यक्त केली.
बुमराहने पुढच्या षटकात याची भरपाई करताना डकेटचा ( ४७) त्रिफळा उडवला आणि इंग्लंडला ११३ धावांवर दुसरा धक्का दिला.