IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 ( Marathi News ) - भारत-इंग्लंड यांच्यातली पहिली कसोटी आजपासून सुरू झाली आणि इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलच्या खांद्यावर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी सोपवली आहे. लोकेश या मालिकेत यष्टिरक्षण करणार नसल्याने केएस भरतला आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. त्यामुळे युवा ध्रुव जुरेल याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यापैकी कर्णधार रोहितने प्लेइंग इलेव्हनमध्ये अक्षरची निवड केली.
भारतीय संघ आज अक्षर, रवींद्र जडेजा व आऱ अश्विन अशा तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरणार आहेत. रोहित व यशस्वी जैस्वाल ही जोडी सलामीला येईल. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह हे दोन जलदगती गोलंदाज संघात आहेत. त्याचवेळी बीसीसीआयनेआवेश खान याला संघातून रिलीज करण्याचा निर्णय घेतला. त्याला रणजी करंडक स्पर्धेत मध्य प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला बीसीसीआयने रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव माघारी परतला आहे आणि त्याच्या जागी रजत पाटीदार याची निवड केल्याचे बीसीसीआयने जाहीर केले.
भारताचा संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह हे खेळाडू असणार आहेत.
इंग्लंडचा संघ ( England Men's XI ) - झॅक क्रॅव्ली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स ( कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लिच