Join us  

ऑली पोपने भारताला दिला 'चोप'; १९६ धावांच्या विक्रमी खेळीसह उभे केले तगडे लक्ष्य 

India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard :  पहिल्या डावात १९० धावांच्या पिछाडीनंतर इंग्लंडचा संघ जबरदस्त पुनरागमन करेल असे कुणालाही वाटले नव्हते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 11:16 AM

Open in App

India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard :  पहिल्या डावात १९० धावांच्या पिछाडीनंतर इंग्लंडचा संघ जबरदस्त पुनरागमन करेल असे कुणालाही वाटले नव्हते. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा निम्मा संघ १६३ धावांवर माघारी पाठवला होता आणि आता शेपूटच गुंडाळायचे होते. पण, ऑली पोप ( Ollie Pope) मैदानावर उभा राहिला आणि विक्रमी खेळी करून संघाला दोनशेपार आघाडी मिळवून दिली. त्यात अक्षर पटेल व लोकेश राहुल यांनी पोपचा झेल सोडून भारताच्या अडचणीत वाढ केली. २०१३ नंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात प्रथमच भारतात ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. Ind vs Eng live match

इंग्लंडच्या पहिल्या डावातील २४६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४३६ धावा करून १९० धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ १६३ धावांत तंबूत परतला होता. पण, ऑली पोप व बेन फोक्स ( ३४) ही जोडी उभी राहिली आणि त्यांनी सहाव्या विकेटसाठी ११२ धावा जोडल्या. फोक्सनंतर रेहान अहमदने पोपला साथ दिली आणि या दोघांनी ९५ चेंडूंत ६४ धावा जोडल्या. बुमराहने चौथ्या दिवशी भारताला पहिले यश मिळवून दिले आणि अहमदला ( २८) बाद केले. टॉम हार्टली आणि पोप यांनी धावांचा ओघ कमी होऊ दिला नाही. हार्टली आत्मविश्वासाने खेळताना दिसला आणि दोघांनी १० षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करून आघाडी दोनशेपार नेली. IND vs ENG 1st Test Live Scoreboard

पण, संघातील प्रमुख फिरकीपटू जॅक लिच ( Jack Leach) हा फलंदाजीला येणं अवघड आहे. आज जेव्हा तो टीमच्या बसमधून उतरला तेव्हा त्याचा पाय सूचलेला दिसला आणि त्याला नीट चालताही येत नव्हतं. ही गोष्ट लक्षात ठेवून पोप-हार्टली मैदानावर खिंड लढवताना दिसले. या कसोटीत जडेजा व अश्विन या दोघांनी १०० पार धावा दिल्या आणि असे हे प्रथमच घडले. १८६ धावांवर खेळणाऱ्या पोपचा सोपा झेल लोकेश राहुलने स्लीपमध्ये टाकला. Ollie Pope dropped on 186* by KL Rahul off Mohammed Siraj. भारतात भारताविरुद्ध ६,७ व ८ क्रमांकावर ५० हून अधिक धावांची भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ ठऱली.Ind vs Eng 1st Test Live Updates

पोप व हार्टली यांची ८० धावांची भागीदारी अश्विनने तोडली. हार्टली ५२ चेंडूंत ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला. जडेजाने मार्क वूडची विकेट घेत इंग्लंडला नववा धक्का दिला. जॅक लिच पायाला सूज असूनही मैदानावर आला.  पोप २७८ चेंडूंत २१ चौकारांसह १९६ धावांवर बाद झाला आणि जसप्रीतने त्याचा त्रिफळा उडवला. इंग्लंडचा दुसरा डाव ४२० धावांत संपुष्टात आला आणि भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य उभे राहिले.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनरवींद्र जडेजा