India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard : ऑली पोपने जरी इंग्लंडचा डाव सांभाळला असला तरी त्यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहने इंग्लंडला सातवा धक्का दिला आणि आता दोन विकेट्स पडताच त्यांचा डाव संपुष्टात येणार आहे.
वातावरण तापले! जसप्रीत बुमराहचा 'खोडसाळपणा'; ऑली पोपची कर्णधार रोहितकडे तक्रार
इंग्लंडच्या पहिल्या डावातील २४६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४३६ धावा करून १९० धावांची आघाडी घेतली. यशस्वी जैस्वाल ( ८०), लोकेश राहुल ( ८६) व रवींद्र जडेजा ( ८७) यांना शतकाने हुलकावणी दिली. दुसऱ्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ १६३ धावांत तंबूत परतला होता. पण, ऑली पोप व बेन फोक्स ( ३४) ही जोडी उभी राहिली आणि त्यांनी सहाव्या विकेटसाठी ११२ धावा जोडून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. चौथ्या दिवशी पोपने १५० धावा पूर्ण केल्या आणि नवा विक्रम नावावर केला. भारतात कसोटीत १५० धावा करणारा तो तिसरा युवा इंग्लिश फलंदाज ठरला Ind vs Eng 1st Test Live Updates
बुमराहने चौथ्या दिवशी भारताला पहिले यश मिळवून दिले. ऑली पोपसोबत सातव्या विकेटसाठी किल्ला लढवणाऱ्या १९ वर्षीय रेहान अहमदला त्याने बाद केले. रेहान ५३ चेंडूंत २८ धावांची महत्त्वाची खेळी करून बाद झाला. रेहानने सातव्या विकेटसाठी पोपसह ९५ चेंडूंत ६४ धावा जोडल्या. टॉम हार्टली आणि पोप यांनी धावांचा ओघ कमी होऊ दिला नाही. हार्टली आत्मविश्वासाने खेळताना दिसला आणि दोघांनी १० षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करून आघाडी दोनशेपार नेली. IND vs ENG 1st Test Live Scoreboard
पण, त्यांची डोकेदुखी वाढली आहे, संघातील प्रमुख फिरकीपटू जॅक लिच ( Jack Leach) हा फलंदाजीला येणं अवघड आहे. आज जेव्हा तो टीमच्या बसमधून उतरला तेव्हा त्याचा पाय सूचलेला दिसला आणि त्याला नीट चालताही येत नव्हतं. अशा परिस्थितीत तो फलंदाजीला येणं अवघड आहेच, शिवाय तो गोलंदाजी करेल की नाही याबाबतही संभ्रम आहे.