जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; India vs England कसोटीत सर्वाधिक धावा 

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 - इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या अर्ध्या तासात भारताच्या जलदगती गोलंदाजांना झोडून काढले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 11:41 AM2024-01-25T11:41:14+5:302024-01-25T11:41:54+5:30

whatsapp join usJoin us
ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - Joe Root has surpassed Sachin Tendulkar to become the leading run scorer in India Vs England Tests, England 108/3 on Day 1 Lunch | जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; India vs England कसोटीत सर्वाधिक धावा 

जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम; India vs England कसोटीत सर्वाधिक धावा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1  ( Marathi News ) - इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या अर्ध्या तासात भारताच्या जलदगती गोलंदाजांना झोडून काढले. बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली, परंतु रोहित शर्माने फिरकी गोलंदाजांना आणले. आर अश्विनने दोन व रवींद्र जडेजाने १ विकेट घेत इंग्लंडला बिनबाद ५५ वरून ३ बाद ६० असे बॅकफूटवर फेकले. त्यानंतर जो रूट ( Joe Root) व जॉनी बेअऱस्टो या जोडीने डाव सावरला. पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने ३ बाद १०८ धावा केल्या आहेत. दरम्यान, रूटने आज महान फलंदाज सचिन तेडुलकरचा मोठा विक्रम मोडला. 

आर अश्विन-रवींद्र जडेजा जोडीने कमाल केली, ऐतिहासिक भरारी घेतली

बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी Bazball प्रथा कायम राखताना ६७ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली आणि यात ४० धावा या चौकारातून मिळवल्या होत्या.  ७ चौकारांच्या मदतीने ३९ चेंडूंत ३५ धावा करणाऱ्या डकेटला ११.५ षटकात आर अश्विनने पायचीत केले. त्यानंतर रवींद्र जडेजाने नवा फलंदाज ओली पोपला ( १) स्लीपमध्ये रोहितच्या हाती झेलबाद केले. अश्विनने इंग्लंडचा दुसरा सलामीवीर क्रॉलीला ( १९) बाद करून इंग्लंडची अवस्था बिनबाद ५५ वरून  ३ बाद ६० धावा अशी केली. मोहम्मद सिराजने भन्नाट झेल घेतला. या विकेटसह अश्विन व जडेजा ही जोडी भारताकडून कसोटीत एकत्रित सर्वाधिक ५०२* विकेट्स घेणारी जोडी बनली. त्यांनी अनिल कुंबळे व हरभजन सिंग या जोडीचा ५०१ विकेट्सचा विक्रम मोडला.  Ind vs Eng 1st Test


IND vs ENG 1st Test Live Scoreboard आर अश्विन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १५० विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. पॅट कमिन्स व नॅथ लियॉन हे प्रत्येकी १६९ विकेट्ससह अश्विनच्या पुढे आहेत. जो रूट व जॉनी बेअरस्टो या अनुभवी जोडीने इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.  जो रूटने आज महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. इंग्लंड-भारत यांच्यातल्या कसोटी सामन्यांत सर्वाधिक २५४०*( ४६ इनिंग्ज) धावांचा विक्रम रूटने नावावर करताना सचिन तेंडुलकरचा २५३५ ( ५३ इनिंग्ज) धावांचा विक्रम मोडला. या विक्रमात सुनील गावस्कर ( २४८३) व सर एलिस्टर कूक ( २४३१) हे अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.  Ind vs Eng live match, Ind vs Eng Live Scorecard
 

Web Title: ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - Joe Root has surpassed Sachin Tendulkar to become the leading run scorer in India Vs England Tests, England 108/3 on Day 1 Lunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.