IND vs ENG 1st Test Live Updates Day 3 - भारतीय संघाची पहिल्या कसोटीवर मजबूत झालेली पकड इंग्लंडच्या ऑली पोपने ( Ollie Pope) सैल केली. १९० धावांची पिछाडी भरून काढताना इंग्लंडचा निम्मा संघ १६३ धावांवर माघारी परतला होता. जसप्रीत बुमराह, आर अश्विन यांनी सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवलेला, परंतु पोप व बेन फोक्स यांनी सहाव्या विकेट्ससाठी विक्रमी शतकी भागीदारी करून इंग्लंडला शतकी आघाडी मिळवून दिली. अक्षर पटेलने ही महत्त्वाची जोडी तोडली, परंतु पोपने तिसऱ्या दिवशी भारताची झोप उडवली. Ind vs Eng 1st Test Live
अश्विन-जडेजा यांचे अप्रतिम चेंडू; काही कळायच्या आत बेअरस्टो, स्टोक्स 'Clean Bowled'; Video
दुसऱ्या डावात झॅक क्रॉली ( ३१) याला आर अश्विनने गुंडाळले. त्यानंतर बेन डकेट व ऑली पोप यांनी इंग्लंडचा डाव सावरला, परंतु लंच ब्रेकनंतर जसप्रीत बुमराहने डकेटचा ( ४७) त्रिफळा उडवला आणि जो रूटला ( २) पायचीत केले. जॉनी बेअरस्टो येताच रोहितने गोलंदाजीत बदल करताना अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांना आणले. जडेजाने अप्रतिम चेंडूवर बेअरस्टोचा ( १०) स्टम्प उडवला. ऑली पोप भारताला नडला. त्याने अर्धशतक झळकावताना डाव सावरला. मात्र, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स ( १०) याला सर्वाधिक १२वेळा आर अश्विनने बाद केला. अश्विनने अप्रतिम चेंडू टाकून स्टोक्सचा त्रिफळा उडवला. Ind vs Eng 1st Test, Ind vs Eng 1st Test Live Updates
पण, त्याच अक्षरने भारताला यश मिळवून दिले. १८३ चेंडूंत ११२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी अक्षरने तोडली आणि बेन फोक्सची ( ३४) विकेट मिळवली. २०१६नंतर प्रथमच इंग्लंडच्या सहा किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकाच्या जोडीने भारतीय खेळपट्टीवर शतकी भागीदारी केली. अहमद रेहानला सोबतीला घेऊन पोप तिसऱ्या दिवसअखेरपर्यंत मैदानावर उभा राहिला. इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३१६ धावा करताना १२६ू धावांची आघाडी घेतली आहे. पोप २०८ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने १४८ धावांवर खेळतोय. रेहान १६ धावांवर नाबाद आहे. Ind vs Eng Live Scorecard