Join us  

५ धावांत ३ विकेट्स! आर अश्विन-रवींद्र जडेजा जोडीने कमाल केली, ऐतिहासिक भरारी घेतली

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 -  इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ आज अक्षर, रवींद्र जडेजा व आऱ अश्विन अशा तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:46 AM

Open in App

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1  ( Marathi News ) -  इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ आज अक्षर, रवींद्र जडेजा व आऱ अश्विन अशा तीन फिरकीपटूंसह मैदानावर उतरला आहे. रोहित व यशस्वी जैस्वाल ही जोडी सलामीला येईल. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह हे दोन जलदगती गोलंदाज संघात आहेत. त्याचवेळी बीसीसीआयने आवेश खान याला संघातून रिलीज करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव माघारी परतला आहे आणि त्याच्या जागी रजत पाटीदार याची निवड केल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. 

ब्रेंडन मॅक्युलम मुख्य प्रशिक्षकपदी आल्यापासून इंग्लंडने कसोटीत बॅझबॉल ही संकल्पना म्हणजेच आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच मॅक्युलमच्या कार्यकाळात आतापर्यंत इंग्लंडने १८ पैकी १३ कसोटी जिंकल्या आहेत. बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी आज तिच प्रथा कायम राखताना ६७ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली आणि यात ४० धावा या चौकारातून मिळवल्या होत्या. ही जोडी आर अश्विनने १२व्या षटकात तोडली. ७ चौकारांच्या मदतीने ३९ चेंडूंत ३५ धावा करणाऱ्या डकेटला ११.५ षटकात अश्वीनने पायचीत केले. 

अश्विनने चौथ्यांदा डकेटला बाद केले आणि एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली. भारताकडून कसोटीत अनिल कुंबळे व हरभजन सिंग या जोडीने एकत्रित सर्वाधिक ५०१ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनच्या या विकेटने रवींद्र जडेजासह ५०१ विकेट्स पूर्ण झाल्या. हरभजन व झहीर खान यांनी एकत्रित ४७४ आणि अश्विन व उमेश यादव यांनी एकत्रित ४३१ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर रवींद्र जडेजाने नवा फलंदाज ओली पोपला ( १) स्लीपमध्ये रोहितच्या हाती झेलबाद केले. इंग्लंडने ५८ धावांवर दुसरा फलंदाज गमावला. या विकेटसह अश्विन व जडेजा ही जोडी कसोटीत भारताकडून एकत्रित सर्वाधिक विकेट्स घेणारी जोडी ठरली.  अश्विनने इंग्लंडचा दुसरा सलामीवीर क्रॉलीला ( १९) बाद करून इंग्लंडची अवस्था ३ बाद ६० अशी केली. मोहम्मद सिराजने भन्नाट झेल घेतला.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनरवींद्र जडेजा