India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard : गॅबामध्ये वेस्ट इंडिजने १९८८ नंतर ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला आणि हैदराबादमध्ये इंग्लंडची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे. ऑली पोपच्या १९६ धावांनी भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने हे लक्ष्य हलक्यात घेतले आणि ते त्यांना महागात पडताना दिसतेय. निम्मा संघ माघारी परतला असताना ११८ धावांची गरज होती आणि रवींद्र जडेजाने खेळपट्टीवर उभे राहणे गरजेचे होते. पण, त्याच्या घाईने भारताला संकटात टाकले.
वेस्ट इंडिज क्रिकेटला पुनरुज्जीवन देणारा नायक! कॅरेबियन बेटावरील दुर्गम भागातून आला अन्...
१९० धावांची पिछाडी भरून काढताना दुसऱ्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ १६३ धावांत तंबूत परतला होता. ऑली पोप व बेन फोक्स ( ३४) यांनी ११२ धावांची भागीदारी करून भारताला बॅकफूटवर फेकले. पोप एका बाजूने उभा राहिला आणि त्याला तळाच्या फलंदाजांची चांगली साथ मिळाली. त्याने रेहान अहमदसह ६४ आणि टॉम हार्टलीसह ८० धावा जोडल्या. १८६ धावांवर खेळणाऱ्या पोपचा सोपा झेल लोकेश राहुलने स्लीपमध्ये टाकला. हार्टली ३४ धावांवर बाद झाला. पोप २७८ चेंडूंत २१ चौकारांसह १९६ धावांवर बाद झाला आणि जसप्रीतने त्याचा त्रिफळा उडवला. इंग्लंडचा दुसरा डाव ४२० धावांत संपुष्टात आला आणि भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य उभे राहिले. IND vs ENG 1st Test Live Scoreboard
टीम हार्टलीने भारताला पहिला धक्का दिला आणि यशस्वी जैस्वाल ( १५) याचा ऑली पोपने शॉर्ट लेगवर सुरेख झेल घेतला. शुबमन गिल पुन्हा अपयशी ठरला आणि हार्टलीने त्याला भोपळ्यावर माघारी पाठवला. रोहित खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याने भारताच्या धावा वाढवल्या. मात्र, हार्टलीने भारतीय कर्णधाराला ३९ धावांवर पायचीत करून मोठा धक्का दिला. रोहितनंतर व्यवस्थापनाने डावखुऱ्या अक्षर पटेलला पुढे पाठवले आणि हा निर्णय योग्य ठरतोय असे वाटत होते.Ind vs Eng 1st Test Live
अक्षर व लोकेश राहुल यांनी डाव सावरताना लक्ष्याच्या दिशेने सकारात्मक वाटचाल केली होती. पण, टी ब्रेकनंतर सामन्याने कलाटणी मारली. हार्टलीच्या गोलंदाजीवर अक्षर ( १७) हलका फटका मारून कॉट अँड बोल्ड झाला... त्यानंतर जो रूटने चकवा देणारा चेंडू टाकून लोकेश राहुलला ( २२) पायचीत केले. भारताचा निम्मा संघ १०७ धावांत तंबूत पाठवण्यात इंग्लंडला यश आले. खेळपट्टीवर उभं राहण्याची आवश्यकता असताना रवींद्र जडेजाने ( २) घाई केली आणि बेन स्टोक्सने डायरेक्ट थ्रो करून त्याला रन आऊट केले. जॅक लिचने गोलंदाजीला येताच श्रेयस अय्यरला माघारी पाठवून भारताला सातवा धक्का दिला. Ind vs Eng 1st Test Live Updates
Web Title: ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - Ravindra Jadeja getting run out, India 119/6 and they needed 112 runs; Ben stokes brillient fielding, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.