Join us  

IND vs ENG 1st Test Live Scorecard : भारतीयांनी घेतली 'फिरकी'! बेन स्टोक्सच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर इंग्लंडची जबरदस्त वापसी

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1  - भारताच्या फिरकीपटूंनी पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा डाव गुंडाळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 2:59 PM

Open in App

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1  - भारताच्या फिरकीपटूंनी पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा डाव गुंडाळला. आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व अक्षर पटेल यांनी अचूक मारा केला. इंग्लंडच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करून देताना जलदगती गोलंदाजांना झोडले होते. पण, कर्णधार रोहित शर्माने फिरकी मारा सुरू केला आणि पाहता पाहता पाहुण्यांचा डाव गडगडला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स एकटा लढला... इंग्लंडने पहिल्या सत्रात ३ विकेट्स गमावून २८ षटकांत १०८ धावा केल्या, तर दुसऱ्या सत्रात ३१ षटकांत १०७ धावांवर ५ विकेट्स गमावल्या. Ind vs Eng 1st Test Live Updates बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी ५५ धावांची भागीदारी करून इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली होती. आर अश्विनने दोन व रवींद्र जडेजाने १ विकेट घेत इंग्लंडला बिनबाद ५५ वरून ३ बाद ६० असे बॅकफूटवर फेकले.  डकेटने ७ चौकारांच्या मदतीने ३९ चेंडूंत ३५ धावा केल्या, तर ओली पोप ( १) व क्रॉली ( १९) स्वस्तात बाद झाले. जो रूट ( Joe Root) व जॉनी बेअऱस्टो या जोडीने डाव सावरला होता. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०५ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने अप्रतिम चेंडूवर बेअरस्टोचा ( ३७) त्रिफळा उडवला. त्यानंतर जडेजाच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा प्रयत्न रुटला ( २९) महागात पडला आणि बुमराहने सोपा झेल घेतला. भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक २५५५ धावांच्या रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी आज रूटने बरोबरी केली. Ind vs Eng 1st Test Live   फिरकीपटू म्हणून जो रूटला सर्वाधिक ९ वेळा बाद करणाऱ्या फिरकीपटूचा मान जडेजाने आज मिळवला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनला ( ८) मागे टाकले. अक्षरने डावातील दुसरी विकेट घेताना बेन फोक्सला ( ४) बाद केले. बेन स्टोक्स हा एकमेव स्पेशालिस्ट फलंदाज मैदानावर उभा होता, परंतु समोरच्या बाजूने विकेट पडण्याचे सत्र सुरू राहिले. जसप्रीत बुमराहने डावातील पहिली विकेट घेताना रेहान अहमदला ( १३) बाद केले.  स्टोक्स व टॉम हार्टली यांनी फटकेबाजी करताना इंग्लंडच्या धावा झटपट वाढवल्या, परंतु जडेजाने ही जोडी तोडली. हार्टलीचा ( २३) त्रिफळा त्याने उडवला. IND vs ENG 1st Test Live Scoreboard 

इंग्लंडच्या कर्णधाराने एका बाजूने जोरदार फटकेबाजी करताना ६९ चेंडूंत कसोटीतील ३१वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने जडेजाला सलग दोन उत्तुंग षटकार हाणले. पण, अश्विनने इंग्लंडचा ९वा धक्का देताना मार्क वूडचा ( ११) त्रिफळा उडवला. जसप्रीतने शेवटची विकेट घेताना स्टोक्सला बाद केले आणि इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांवर गुंडाळला गेला. स्टोक्सने ८८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७० धाव केल्या. Ind vs Eng live match, Ind vs Eng Live Scorecard 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबेन स्टोक्सआर अश्विनरवींद्र जडेजा