India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard : इंग्लंडने रविवारी हैदराबाद येथे इतिहास रचला... पहिल्या डावात १०० हून अधिक धावांची आघाडी घेऊनही भारतावर प्रथमच पराभवाची नामुष्की ओढावली. ऑली पॉपच्या १९६ धावांनंतर पदार्पणवीर टॉम हार्टलीने ७ विकेट्स घेत इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या २३१ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा दुसरा डाव २०२ धावांवर गडगडला. इंग्लंडने २८ धावांनी सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
२३१ धावाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला टॉम हार्टलीने ७ धक्के दिले. इंग्लंडकडून पदार्पणाच्या कसोटीत सर्वोत्तम कामगिरी करताना तो तिसरा फिरकीपटू ठरला. त्याने या कसोटीत १९३ धावा देताना ९ विकेट्स घेतल्या आणि जिम लेकर यांचा १९४८सालचा ( ९ बाद १९८ धावा वि. वेस्ट इंडिज) विक्रम मोडला.
रोहित शर्मा काय म्हणाला?कुठे चूक झाली हे ओळखणे कठीण आहे. १९० धावांची आघाडी मिळाल्याने आम्हाला वाटले की आम्ही फलंदाजीमध्ये चांगला खेळ करू शकतो. ऑली पोपने अपवादात्मक फलंदाजी केली आणि परदेशी फलंदाजाने भारतीय परिस्थितीत केलेल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक होती. पोपने शानदार खेळी केली. गोलंदाजांनी योजना खरोखर चांगल्या प्रकारे अंमलात आणल्या. २३० धावा हा अवघड नव्हत्या, परंतु आम्ही त्या करू शकलो नाही. एकूणच, एक संघ म्हणून आम्ही अपयशी ठरलो. सिराज आणि बुमराह यांनी खेळ पाचव्या दिवशी न्यावा, अशी माझी इच्छा होती. तळाच्या फलंदाजांनी खरोखरच चांगली लढत दिली.