IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 ( Marathi News ) - भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांच्या फिरकी माऱ्याने हैराण झालेल्या इंग्लंडला जसप्रीत बुमराहनेही धक्के दिले. इंग्लंडचा पहिला डाव ६४ षटकांत गुंडाळून भारतीय संघ फलंदाजीला उतरला अन् सलामीवीर यशस्वी जैस्वालने पाहुण्यांना धू धू धुतला... यशस्वीच्या आक्रमणासमोर इंग्लंडच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. सैरभैर झालेल्या इंग्लंडने १४ षटकांत तिन्ही रिव्ह्यूही गमावले. Ind vs Eng 1st Test
जसप्रीत बुमराहने त्रिफळा उडवला, बाद होऊनही बेन स्टोक्सने केलं कौतुक, Video
झॅक क्रॉली ( २०) व बेन डकेट ( ३५) यांच्या आक्रमक सुरुवातीनंतर आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडला धक्के दिले. जो रूट ( २९) व जॉनी बेअरस्टो ( ३७) यांनी मधल्या फळीत चांगला खेळ केला, परंतु अक्षर पटेलने सुरेख मारा करून ही जोडी तोडली. इंग्लंडची अवस्था ६ बाद १३७ झाली होती आणि भारताला त्यांना झटपट गुंडाळण्याची संधी होती. पण, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स उभा राहिला. टॉम हार्टलीने २३ धावांचे योगदान दिले. स्टोक्सने ८८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७० धाव केल्या आणि इंग्लंडचा पहिला डाव ६४.३ षटकांत २४६ धावांवर गडगडला. आर अश्विन ( ३-६८), रवींद्र जडेजा ( ३-८८), अक्षर पटेल ( २-३३) व जसप्रीत बुमराह ( २-२८) यांनी विकेट्स घेतल्या. IND vs ENG 1st Test Live Scoreboard
भारताने दिवसअखेर १ बाद ११९ धावा केल्या आणि अजूनही १२७ धावांनी संघ पिछाडीवर आहे. यशस्वीने ७० चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा केल्या आहेत, तर गिल १४ धावांवर खेळतोय. Ind vs Eng Live Scorecard