IND vs ENG 1st Test Live Updates Day 3 ( Marathi News ) - भारतीय संघाने पहिल्या कसोटीत वर्चस्व गाजवले आहे. लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल व रवींद्र जडेजा यांना ८० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर माघारी जावे लागले. त्यामुळे भारताच्या एकाही फलंदाजाला तिहेरी आकडा पार करता आला नाही. लोकेश व यशस्वी यांना अपयश आले असले तरी जडेजा शतक पूर्ण करेल असे वाटत होते, परंतु तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयाने घात केला. चेंडू बॅटला आधी लागलाय की पॅडला हेच त्याला ठरवता आले नाही आणि त्याने मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखला. त्यामुळे जडेजाला ८७ धावांवर पायचीत होऊन माघारी जावे लागले, परंतु या निर्णयाने सोशल मीडियावर वातावरण तापले आहे. Ind vs Eng 1st Test
इंग्लंडच्या पहिल्या डावातील २४६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४३६ धावा करून १९० धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात करून देताना ७४ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ८० धावा चोपल्या. रोहित शर्मा ( २४), शुबमन गिल ( २३ ) व श्रेयस अय्यर (३५) यांनी मोठी खेळी साकारली नसली तरी त्यांचे मैदानावर उभे राहणे महत्त्वाचे ठरले. लोकेश राहुलने १२३ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह केलेली ८६ धावांची खेळी अप्रतिम होती. श्रीकर भरतने ८१ चेंडूंत ४१ धावांची परिपक्व खेळी करून दाखवली. रवींद्र जडेजा व अक्षर पटेल यांनी ७८ धावांची भागीदारी केली. IND vs ENG 1st Test Live Scoreboard
या भागीदारीला जो रूटने ब्रेक लावला. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याने जडेजाला पायचीत केले. जडेजा १८० चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८७ धावांवर बाद झाला. पण, या विकेटने वाद रंगला आहे. रूटने पुढील चेंडूवर जसप्रीत बुमराहचा त्रिफळा उडवला. रेहान अहमदने शेवटची विकेट घेताना भारताचा पहिला डाव ४३६ धावांवर गुंडाळला. अक्षर पटेल ४४ धावांनी माघारी परतला. , Ind vs Eng 1st Test Live Updates