Join us  

India vs England, 1st Test : माझं नाव वॉशिंग्टन...; यष्टिंमागून रिषभ पंतची सुरू होती बडबड, BCCI पोस्ट केला भन्नाट Video 

India vs England, 1st Test : भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात दोन बळी घेतले. त्यानंतर रुटच्या स्ट्रोकफुल व डॉम सिब्लेच्या संयमी खेळीपुढे यजमान संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले.

By स्वदेश घाणेकर | Published: February 06, 2021 10:15 AM

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडच्या फलंदाजांची दुसऱ्या दिवशी सावध सुरुवात, रुट-बेन स्टोक्स लढवतायत खिंडइंग्लंडची मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं कूच

India vs England, 1st Test : कर्णधार ज्यो रुटने ( Joe Root)  शानदार फॉर्म कायम राखताना आपल्या १०० व्या कसोटीत शतक झळकावण्याची कामगिरी केली. त्याच्या जोरावर पाहुण्या इग्लंडने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ३ बाद २६३ धावांची मजल मारत विशाल धावसंख्या उभारण्याची मजबूत पायाभरणी केली. पहिल्या दिवसाच्या खेळात इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना हतबल करत असताना यष्टिंमागे रिषभ पंत ( Rishabh Pant) बडबड करून त्यांचे मनोबल उंचावत होता. त्याच्या याच बडबडीचा एक व्हिडीओ BCCIनं त्यांच्या साईटवर अपलोड केला आहे.

भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रात दोन बळी घेतले. त्यानंतर रुटच्या स्ट्रोकफुल व डॉम सिब्लेच्या संयमी खेळीपुढे यजमान संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह खेळला, पण केवळ रविचंद्रन अश्विनला काहीअंशी छाप सोडता आली. वॉशिंग्टन सुंदर व शाहबाज नदीम साधारण गोलंदाज भासले. भारतात आपला पहिला कसोटी सामना खेळत असलेला जसप्रीत बुमराह आतापर्यंत सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्या दिवशी दोन विकेट्स घेतल्या.    IPL 2021 Auction : मिचेल स्टार, जो रूट OUT; एस श्रीसंत, अर्जुन तेंडुलकर IN, जाणून घेऊया सर्वांची बेस प्राईज

पाहा व्हिडीओ..

जो रूटने पहिल्याच दिवशी केले अनेक विक्रम... 

- जो रूटनं आतापर्यंत भारतात ७ कसोटी सामने खेळले आणि प्रत्येक सामन्यातील किमान एका डावात तरी त्यानं ५० किंवा ५०+ धावा केल्या आहेत.  जो रुटची भारतातील कसोटी सामन्यांतील कामगिरी ७३ व २०* ( नागपूर), १२४ व ४ ( राजकोट), ५३ व २५ ( वायझॅक), १५ व ७६ ( मोहाली), २१ व ७७ ( मुंबई), ८८ व ६ ( चेन्नई), १००* (चेन्नई) 

- ९८, ९९  व १०० व्या सामन्यात शतकी खेळी करणारा जो रुट हा जगातील पहिलाच क्रिकेटपटू आहे. भारतात दाखल होण्यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या दोन्ही कसोटीत त्यानं ( २२८ व १८६)  शतकी खेळी केली होती.   

- जो रुट व डॉम सिब्ली यांनी तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतात भारताविरुद्ध केलेली ही दुसरी द्विशतकी भागीदारी आहे. यापूर्वी २०१२मध्ये जॉनथन ट्रॉट व इयान बेन यांनी चौथ्या विकेटसाठी दोनशे धावा जोडल्या होत्या.  

शंभराव्या कसोटीत शतक झळकावणारे फलंदाजकॉली कॉवड्रे (इंग्लंड) जावेद मियाँदाद ( पाकिस्तान) गॉर्डन ग्रीनीज ( वेस्ट इंडिज)अॅलेक स्टेवर्ट ( इंग्लंड) इंझमाम-उल-हक ( पाकिस्तान)  रिकी पाँटिंग ( ऑस्ट्रेलिया)ग्रॅमी स्मिथ ( दक्षिण आफ्रिका)  हाशीम आमला ( दक्षिण आफ्रिका) जो रुट ( इंग्लंड)

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरिषभ पंतजो रूट