India vs England, 1st Test Day 3: टीम इंडियावरील फॉलोऑनचे संकट अधिक गडद होत चाललं असताना रिषभ पंत ( Rishabh Pant) व चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आले. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खंबीरपणे सामना करताना टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. पण, शतकी भागीदारी पूर्ण केल्यानंतर दोघंही एकापाठोपाठ माघारी परतले. चेतेश्वर पुजारा तर विचित्र पद्धतीनं बाद झाला. रिषभचे शतक पुन्हा एकदा हुकले. हे दोघं खेळपट्टीवर असेपर्यंत टीम इंडियावरील फॉलोऑनचं संकट टळेल असे वाटले होते, परंतु ते अजूनही कायम आहे. वेस्ट इंडिजचा नादच करायचा न्हाय...!; पदार्पणातच कायले मेयर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् संघाचा रोमहर्षक विजय
मॅचचे हायलाईट्स
- जो रुटच्या ( Joe Root) द्विशतकाच्या जोरावर आणि अन्य फलंदाजांच्या महत्त्वाच्या खेळींमुळे इंग्लंडनं पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभा केला. पण, जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) चौथ्याच षटकात अप्रतिम बाऊन्सर टाकून रोहितला ( Rohit Sharma) स्तब्ध केलं. शुबमन गिलला ( Shubman Gill) आर्चरच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका मारणे महागात पडले. ३८ वर्षीय जेम्स अँडरसननं अफलातून झेल घेतला. चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं झाला बाद; इंग्लंडच्या खेळाडूंनाही बसेना विश्वास, Video
- त्यानंतर आलेल्या रिषभनं आक्रमक खेळी करताना अर्धशतक पूर्ण केलं. विराट कोहलीनंतर भारतात कसोटीतील पहिल्या तीन डावांत अर्धशतक करणारा रिषभ पंत हा दुसराच भारतीय फलंदाज ठरला. रिषभ-चेतेश्वर या जोडीनं पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
- त्यानंतर रिषभ पंतही बेसच्या गोलंदाजीवर बाद झाला. उत्तुंग फटका मारण्याचा रिषभचा प्रयत्न फसला आणि लिचनं त्याचा झेल घेतला. रिषभनं ८८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह ९१ धावा केल्या. तो चौथ्यांदा नव्हर्स ९०वर बाद झाला. याआधी २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सौराष्ट्र व हैदराबाद कसोटीत तो ९२-९२ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर २०२१च्या सिडनी कसोटीत ९७ धावांवर बाद झाला.
इंग्लंडच्या डॉम बेसनं चार विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चरनं दोन बळी टिपले.