IND vs ENG : इंग्लंडच्या 'Bazball'वर रोहित शर्माचा षटकार; म्हणाला, ते कसे खेळतात यापेक्षा... 

भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका उद्यापासून सुरू होत आहे. इंग्लंड संघाला २०१२ पासून भारतीय भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:36 PM2024-01-24T12:36:46+5:302024-01-24T12:37:12+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 1st Test : We look to play our cricket. Not looking at how the opposition is playing, we want to focus on our cricket," says Rohit Sharma on bazball  | IND vs ENG : इंग्लंडच्या 'Bazball'वर रोहित शर्माचा षटकार; म्हणाला, ते कसे खेळतात यापेक्षा... 

IND vs ENG : इंग्लंडच्या 'Bazball'वर रोहित शर्माचा षटकार; म्हणाला, ते कसे खेळतात यापेक्षा... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 1st Test Rohit Sharma press conference  ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका उद्यापासून सुरू होत आहे. इंग्लंड संघाला २०१२ पासून भारतीय भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १३१ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने ३१ सामने, इंग्लंडने ५० सामने जिंकले आहेत. ५० सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय खेळपट्टींमधील हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताने ६४ पैकी २२ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला १४ कसोटी जिंकल्या आहेत. पण, यावेळी विराट कोहलीच्या माघारीमुळे टीम इंडिया किंचितशी बॅकफूटवर गेली आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या पूर्वसंध्येला मोठं विधान केलं आहे. 

IND vs ENG Playing XI : KL Rahul चौथ्या क्रमांकावर खेळणार, दोन जागांसाठी ४ जणांमध्ये चुरस


रोहित शर्मा म्हणाला, कसोटी क्रिकेट जीवंत ठेवणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. एक खेळाडू म्हणून क्रिकेटचा हा फॉरमॅट तुमच्यासाठी आव्हानात्मक आहे. कसोटी क्रिकेट खेळताना तुमच्या मनात जर तर अशा शंकेला वाव असता कामा नये. तुम्हाला काय करायचे याबाबत स्पष्टता हवी. आम्ही सर्व रणजी, इराणी, दुलीप ट्रॉफीत खेळलो आहोत, परंतु कसोटीचं दडपण हे वेगळं असतं.


केप टाऊन कसोटीतील विजयाने आत्मविश्वास वाढला असल्याचे रोहितने स्पष्ट केले. तो म्हणाला, केप टाऊना विजय हा खूपच चांगला होता, परंतु आम्ही आता हैदराबादमध्ये आहोत. परस्पर विरोधी परिस्थिती आहे. मात्र, तो विजय आत्मविश्वास वाढवणारा होता. भारतीय संघ प्रथमच ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. आम्हाला अशा ४-५ सामन्यांच्या मालिका खेळायच्या होत्या. सलग दोन महिने कसोटी क्रिकेट खेळणे आव्हानात्मक आहे. 
 
अश्विन आणि सिराज हे आमच्यासाठी महत्त्वाचे खेळाडू आहेत. मागील दोन वर्ष सिराजने दमदार कामगिरी करून दाखवली आहे. अश्विन एक क्सास खेळाडू आहे आणि प्रत्येकवेळी त्याने आम्हाला आश्चर्यचकित केले आहे, असेही रोहित म्हणाला. यावेळी त्याला इंग्लंडच्या बॅझबॉल शैलीबाबत विचारण्यात आले. त्यावर त्याने मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, आम्ही आमच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रतिस्पर्धी कसा खेळतो, याबाबत मला काडीचाही रस नाही. माझं लक्ष्य हे एक संघ म्हणून आम्ही कशी कामगिरी करतो यावर आहे.  

 

Web Title: IND vs ENG 1st Test : We look to play our cricket. Not looking at how the opposition is playing, we want to focus on our cricket," says Rohit Sharma on bazball 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.