Join us  

India vs England, 1st Test : कपड्याच्या व्यापाऱ्यानं तयार केलीय चेन्नईची खेळपट्टी; ४३ वर्षीय व्यक्तीचं अनोखं पदार्पण

India vs England, 1st Test : भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यातून ४३ वर्षीय व्यक्तिचंही पदार्पण होत आहे. चेन्नईत १३ फेब्रुवारीपासून सुरूवात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही तो सदस्य असणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 05, 2021 10:59 AM

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडच्या सलामीवीरांची अर्धशतकी भागीदारी, टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटीदुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रिषभ पंतकडून झेल सुटला

India vs England, 1st Test : भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यातून ४३ वर्षीय व्यक्तिचंही पदार्पण होत आहे. चेन्नईत १३ फेब्रुवारीपासून सुरूवात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही तो सदस्य असणार आहे. २०२१ वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात व्ही रमेश कुमार ( V Ramesh Kumar) यांना तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून कॉल गेला... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठीच्या  खेळपट्टीच्या क्युरेटरची जबाबदारी स्वीकारशील का; असे त्याला विचारण्यात आले. रमेशलाही हे सर्व आश्चर्यकारक वाटले. यापूर्वी त्यानं कधीच क्युरेटरची जबाबदारी पार पाडली नव्हती, इतकंच काय तर प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्येही तो कधीच क्युरेटर नव्हता. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत रमेशला चेपॉकची खेळपट्टी तयार करायची होती.  India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू अन् रिषभ पंतकडून सुटला झेल

''मला आश्चर्याचा धक्का बसला. मी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडे काही दिवसांची मुदत मागितली. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी माझा बिझनेस कसा संभाळेन हा प्रश्न माझ्यासमोर होता आणि त्यासाठी कुटुंबीयांशी मला बोलायचे होते,''असे रमेशनं cricinfo शी बोलताना सांगितले. रमेश कुमार हा कपड्यांचा व्यापारी आहे. रमेश हा सिटी तिरपूर येथे कपड्याचा व्यापारी आहे.  जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली; मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली

पिच मेकिंगची कला शिकूनच क्युरेटर बनतात आणि त्यानंतर अनुभवाच्या जोरावर खेळपट्टी बनवण्यास तयार होतात. पण रमेशकडे या गोष्टींचा कोणताही अनुभव नाही. रमेश आपल्या महाविद्यालयीन जीवनात चांगला अॅथलीट होता. ११० मीटर धावण्याचा शर्यतीमध्ये त्यानं तामिळनाडूचे प्रतिनिधीत्व केले होते, त्याचबरोबर तो राज्याच्या रिले संघाचाही सदस्य होता. रमेश यांनी १९९६ साली दोन राष्ट्रीय पदके जिंकलेली आहे. 

रमेशच्या दोन कपड्यांच्या कंपन्या आहेत. Cosimo International असे त्याच्या कंपनीचं नाव असू तो युरोप येथील कंपनीला माल निर्यात करतो. आणि Allwin Coloursअसे दुसऱ्या कंपनीचं नाव आहे. दोन्ही कंपनीत ७०० कर्मचारी काम करतात. त्यानं इंटरनॅशनल बिझनेसमध्ये MBA केलं आहे.  नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं; पाच गोलंदाजांसह टीम इंडिया मैदानात उतरणार

जुलै २०१८मध्ये रमेशनं BCCIचा एक कोर्स पूर्ण केला आणि कोईंम्बतूर, त्रिपूरा व सालेम येथे १६, १९ व २३ वर्षांखालील स्पर्धांसाठी त्यानं खेळपट्टी तयार केल्या आहेत. २०१९च्या आयपीएलमध्ये रमेशनं चेपॉकच्या खेळपट्टीची जबाबदारी पाहावी अशी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनची इच्छा होती, परंतु बिझनेसमुळे त्याला तेव्हा जमले नाही. Bad News; सामना सुरू होण्याआधीच टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे खेळाडूची माघार

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहरिषभ पंत