IND vs ENG 2021 : सलामीवीर शुबमन गिल याला दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी राखीव सलामीवीर म्हणून कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पृथ्वी शॉ याला इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याची विनंती निवड समितीकडे केली होती. पण, निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर आता आहे त्या पर्यायापैकी एकाला रोहित शर्मासोबत कसोटी मालिकेत सलामीला पाठवण्याचा विचार सुरू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयांक अग्रवाल आणि रोहित हे ४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कसोटीत सलामीला उतरणार आहेत. ( Mayank Agarwal is likely to open alongside Rohit Sharma in the first Test that starts on August 4)
विराट कोहली, रवी शास्त्री यांना झटका; निवड समितीनं अमान्य केली त्यांची मागणी
अग्रवालसह लोकेश राहुल व राखीव खेळाडू अभिमन्यू इश्वरन हे दोन पर्यायही टीम इंडियाकडे आहेत. ''इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या २४ खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉचा विचार करण्यात आलेला नव्हता. मग आता विचार बदलण्याची गरज नाही,'' असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
मोठी बातमी : MS Dhoni आयपीएल २०२२त खेळणार की नाही?; चेन्नई सुपर किंग्सची महत्त्वाची घोषणा
कपिल देव यांनी व्यक्त केली नाराजीभारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी कोहली व शास्त्री यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. संघात लोकेश राहुल, मयांक अग्रवाल असतानाही पृथ्वी शॉ याला इंग्लंड दौऱ्यासाठी विचारणा करण्यावर कपिल देव यांनी संताप व्यक्त केला. हा संघातील खेळाडूंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. ''अशी मागणी करण्याची गरज नव्हती. निवड समितीचा आदर करायला हवा. त्यांनी संघ निवड केली आणि विराट व शास्त्री यांचाही त्यात सहभाग होताच. तुमच्याकडे मयांक अग्रवाल व लोकेश राहुल हे सलामीवीर आहेत. तरीही तुम्हाला तिसरा पर्याय हवाय?; हे चुकीचं आहे,''असे कपिल देव म्हणाले.