IND vs ENG, 2nd ODI : लोकेश राहुलची शतकी खेळी, विराट व रिषभ यांच्यासह झळकावली डबल सेन्चुरी

India vs England, 2nd ODI : ट्वेंटी-२० मालिकेत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलनं ( KL Rahul) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 04:42 PM2021-03-26T16:42:58+5:302021-03-26T16:45:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd ODI : 5th ODI Hundred For KL Rahul & 2nd Hundred in India, two hundred runs partnership with Virat and Rishabh | IND vs ENG, 2nd ODI : लोकेश राहुलची शतकी खेळी, विराट व रिषभ यांच्यासह झळकावली डबल सेन्चुरी

IND vs ENG, 2nd ODI : लोकेश राहुलची शतकी खेळी, विराट व रिषभ यांच्यासह झळकावली डबल सेन्चुरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 2nd ODI : ट्वेंटी-२० मालिकेत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलनं ( KL Rahul) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावले. लोकेशचे वन डे क्रिकेटमधील हे पाचवे शतक ठरले. लोकेशनं पहिल्या वन डे सामन्यात नाबाद ६२ धावा करताना कृणाल पांड्यासह टीम इंडियाचा डाव सावरला होता. आजही त्यानं कर्णधार विराट कोहलीसह ( Virat Kohli) १२१ धावांची भागीदारी करताना टीम इंडियाची गाडी रुळावर आणली आणि त्यानंतर रिषभ पंतसह ( Rishab Pant) चौथ्या विकेटसाठी आक्रमक खेळी करून शतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानं १०८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकांरांसह शतक पूर्ण केलं. त्यानं शतकानंतर कानावर बोट ठेवून टीकाकारांना उत्तर दिलं.  IND vs ENG, 2nd ODI : अम्पायरच्या चुकीच्या निर्णयामुळे टीम इंडियाला फटका; रिषभ पंत नाराज, नेटिझन्स खवळले

शिखर धवनला ( Shikhar Dhawan) आज आपयश आलं. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या रिले टॉप्लीनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. धवन ( ४) स्लीपमध्ये बेन स्टोक्सच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर सॅम कुरननं इंग्लंडला मोठी विकेट मिळवून दिली. रोहित शर्मा ( २५) ९व्या षटकात कुरनच्या गोलंदाजीवर आदिल राशिदच्या हाती झेल देऊन बाद झाला. विराट कोहलीलोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. विराटपाठोपाठ लोकेशनंही अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांनी १४१ चेंडूंत १२१ धावा जोडल्या. विराट कोहली ७९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून ६६ धावांवर आदिल राशिदच्या गोलंदाजीवर बाद झाला.
रिषभ पंत ( Rishabh Pant) त्याच्या आक्रमक अंदाजातच दिसला. त्यानं लोकेश राहुलसह ४४ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रिषभनं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं आणि त्यात  ३ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. 


अम्पायरच्या निर्णयाचा टीम इंडियाला फटका
भारत-इंग्लंड मालिकेत सातत्यानं अम्पायरच्या निर्णयाची चर्चा राहिली आहे. Soft Signal, Umpires Call's या नियमांवरून  नाराजी व्यक्त होत असताना दुसऱ्या वन डे सामन्यातही अशाच एका निर्णयाचा टीम इंडियाला फटका बसला. ४० व्या षटकात टॉम कुरनच्या अखेरच्या चेंडूवर रिषभ पंतनं ( Rishabh Pant) रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजानं अपील केल्यानंतर मैदानावरील अम्पायरनं रिषभला LBW बाद दिले. पण चेंडू बॅटला लागल्याचं सांगत रिषभनं DRS घेतला. रिषभनं मारलेला तो चेंडू यष्टिरक्षक जोस बटलरला चकवा देत सीमा पार गेला. DRS मध्ये चेंडू खरंच बॅटला लागल्याचे दिसले आणि मैदानावरील अम्पायरला निर्णय बदलावा लागला. पण, त्याचबरोबर भारताला चार धावा मिळाल्या नाही. कारण  अम्पायरनं रिषभला बाद ठरवले होते. रिषभनं या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. 2nd odi ind vs eng Live udates Score Mca Stadium

Web Title: IND vs ENG, 2nd ODI : 5th ODI Hundred For KL Rahul & 2nd Hundred in India, two hundred runs partnership with Virat and Rishabh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.