IND vs ENG, 2nd ODI : ९९ धावांवर बाद झाल्यानंतर बेन स्टोक्सनं मागितली वडिलांची माफी, Emotional Video

India vs England, 2nd ODI : जेसन रॉय ( Jason Roy)  व जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी दमदार सुरूवात करून देताना इंग्लंडचा पाया मजबूत केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 09:14 PM2021-03-26T21:14:27+5:302021-03-26T21:14:41+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd ODI : Ben Stokes said "Sorry" to his father in heaven after getting out on 99, Watch Video | IND vs ENG, 2nd ODI : ९९ धावांवर बाद झाल्यानंतर बेन स्टोक्सनं मागितली वडिलांची माफी, Emotional Video

IND vs ENG, 2nd ODI : ९९ धावांवर बाद झाल्यानंतर बेन स्टोक्सनं मागितली वडिलांची माफी, Emotional Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 2nd ODI : जेसन रॉय ( Jason Roy)  व जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी दमदार सुरूवात करून देताना इंग्लंडचा पाया मजबूत केला. बेअरस्टोनंही शतक झळकावले आणि त्याला बेन स्टोक्सची ( Ben Stokes)  तोलामोलाची साथ मिळाली.बेअरस्टोसह दुसऱ्या विकेटसाठी त्यानं ११७ चेंडूंत १७५ धावांची भागीदारी केली.  स्टोक्सनं ५२ चेंडूंत ४ चौकार व १० षटकारांची आतषबाजी करताना ९९ धावा चोपल्या. पण, ९९ धावांवरून माघारी परतत असताना स्टोक्सनं आकाशाच्या दिशेनं पाहताना वडिलांची माफी मागितली.  'सुपर मॅन' रोहित शर्मा; टीम इंडियासाठी धावही वाचवली अन् महत्त्वाची विकेटही घेतली, Video

डिसेंबर २०२०मध्ये झालेलं वडिलांचं निधन...
बेन स्टोक्स यंदाची आयपीएल खेळणार की नाही, याबाबतही साशंकता होती. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतूनही बेन स्टोक्सनं माघार घेतली होती. त्याचे वडील गेड हे कॅन्सरशी झगडत होते आणि ते न्यूझीलंडमध्ये उपचार घेत होते. त्यामुळे स्टोक्स यंदाच्या आयपीएलला मुकण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, वडिलांच्या सांगण्यावरून स्टोक्स दुबईत दाखल झाला आणि आज त्यानं तुफानी खेळी केली. स्टोक्सचे वडील गेड हे रग्बीपटू होते. 1980मध्ये रग्बी सामन्यात त्यांना त्यांच्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग गमवावा लागला होता. त्यावेळी शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे नव्हते. ८ डिसेंबर २०२० मध्ये त्यांचे वयाच्या ६४व्या बर्षी निधन झाले.



बेन स्टोक्स OUT or NOT OUT?
बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) बेअरस्टोच्या सोबत इंग्लंडच्या धावांचा वेग वाढवला. २६व्या षटकात कुलदीप यादवच्या डायरेक्ट थ्रोने स्टम्पचा वेध घेतला. पण, स्टोक्सनं तोपर्यंत बॅट क्रीजच्या रेषेवर ठेवली होती. या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या आणि तिसऱ्या अम्पायरनं स्टोक्सला नाबाद दिले. या निर्णयावर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) नाखूश दिसला आणि तो मैदानावरील अम्पायरला प्रात्याक्षिक करून दाखवू लागला. ind vs eng Live, 2nd odi ind vs eng

Web Title: IND vs ENG, 2nd ODI : Ben Stokes said "Sorry" to his father in heaven after getting out on 99, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.