India vs England, 2nd ODI : ३३७ धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर असूनही इंग्लंडच्या सलामीवीरांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी पुन्हा एकदा शतकी खेळी करताना विक्रमाची नोंद केली. पण, त्यांच्या या भागीदारीला रोहित शर्मा ( Rohit Sharma) नं ब्रेक लावला. रोहितनं टीम इंडियासाठी एक धाव अडवलीच शिवाय महत्त्वाची विकेटही मिळवून दिली. त्यानंतर बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) बेअरस्टोच्या सोबत इंग्लंडच्या धावांचा वेग वाढवला. २६व्या षटकात कुलदीप यादवच्या डायरेक्ट थ्रोने स्टम्पचा वेध घेतला. पण, स्टोक्सनं तोपर्यंत बॅट क्रीजच्या रेषेवर ठेवली होती. या दोन्ही घटना एकाच वेळी घडल्या आणि तिसऱ्या अम्पायरनं स्टोक्सला नाबाद दिले. या निर्णयावर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) नाखूश दिसला आणि तो मैदानावरील अम्पायरला प्रात्याक्षिक करून दाखवू लागला. 2nd odi ind vs eng Live udates Score Mca Stadium
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानंही मी आऊट दिले असते असे ट्विट केले.
टीम इंडियाच्या फलंदाजांनी दाखवला दम...
लोकेश राहुलचे ( KL Rahul) शतक अन् विराट कोहली ( Virat Kohli) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या वन डे सामन्यात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा केला. लोकेशनं चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह १०८ धावांची खेळी केली. विराटही ७९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून ६६ धावांवर माघारी परतला, तर रिषभनं कहर केला. रिषभनं ४० चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७७ धावा चोपल्या. हार्दिक पांड्यानं १६ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ३५ धावा चोपून संघाच्या धावसंख्येत भर घातली. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४१ चेंडूंत १२१ धावा जोडल्या. विराट माघारी परतल्यानंतर रिषभनं आक्रमक खेळ केला. त्यानं लोकेशसह चौथ्या विकेटसाठी ८० चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली.
इंग्लंडची पुन्हा एकदा शतकी सलामी...
जॉनी बेअरस्टो व जेसन रॉय यांनी पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६व्या षटकात शतकी भागीदारी पूर्ण केली. इंग्लंडकडून सर्वाधिक १३ शतकी भागीदारीचा विक्रम या दोघांच्या नावावर जमा झाला. ( Jonny Bairstow and Jason Roy ) या दोघांनी इयॉन मॉर्गन व जो रूट ( १२) यांचा विक्रम मोडला. जो रुट व जेन रॉय यांच्या नावावर ७ शतकी भागीदारी आहेत. १७व्या षटकात या जोडीचा ताळमेळ तुटला अन् जेसन रॉयला ( ५५) धावबाद होऊन माघारी जावं लागलं. या खेळीत त्यानं ७ चौकार व १ षटकार खेचला. रोहित शर्मानं सुरेख फिल्डिंग करताना टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं.
Web Title: IND vs ENG, 2nd ODI : Benefit of the doubt went with the batsman, Ben Stokes is not out, Virat Kohli disappoint
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.