IND vs ENG, 2nd ODI : 'सुपर मॅन' रोहित शर्मा; टीम इंडियासाठी धावही वाचवली अन् महत्त्वाची विकेटही घेतली, Video

India vs England, 2nd ODI : ३३७ धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर असूनही इंग्लंडच्या सलामीवीरांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 07:25 PM2021-03-26T19:25:55+5:302021-03-26T19:26:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd ODI : Brilliant fielding by Rohit Sharma, break 110 runs opening partnership, Watch Video  | IND vs ENG, 2nd ODI : 'सुपर मॅन' रोहित शर्मा; टीम इंडियासाठी धावही वाचवली अन् महत्त्वाची विकेटही घेतली, Video

IND vs ENG, 2nd ODI : 'सुपर मॅन' रोहित शर्मा; टीम इंडियासाठी धावही वाचवली अन् महत्त्वाची विकेटही घेतली, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 2nd ODI : ३३७ धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर असूनही इंग्लंडच्या सलामीवीरांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी पुन्हा एकदा शतकी खेळी करताना विक्रमाची नोंद केली. पण, त्यांच्या या भागीदारीला रोहित शर्मा ( Rohit Sharma) नं ब्रेक लावला. रोहितनं टीम इंडियासाठी एक धाव अडवलीच शिवाय महत्त्वाची विकेटही मिळवून दिली. 2nd odi ind vs eng Live udates Score Mca Stadium

टीम इंडियाच्या फलंदाजांनी दाखवला दम...
लोकेश राहुलचे ( KL Rahul) शतक अन् विराट कोहली ( Virat Kohli) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या वन डे सामन्यात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा केला. लोकेशनं चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह १०८ धावांची खेळी केली. विराटही ७९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून ६६ धावांवर माघारी परतला, तर रिषभनं कहर केला.  रिषभनं ४० चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७७ धावा चोपल्या. हार्दिक पांड्यानं १६ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ३५ धावा चोपून संघाच्या धावसंख्येत भर घातली. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी  १४१ चेंडूंत १२१ धावा जोडल्या. विराट माघारी परतल्यानंतर रिषभनं आक्रमक खेळ केला. त्यानं लोकेशसह चौथ्या विकेटसाठी ८० चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली.   ind vs eng Live, 2nd odi ind vs eng

इंग्लंडची पुन्हा एकदा शतकी सलामी...
जॉनी बेअरस्टो व जेसन रॉय यांनी पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६व्या षटकात शतकी भागीदारी पूर्ण केली. इंग्लंडकडून सर्वाधिक १३ शतकी भागीदारीचा विक्रम या दोघांच्या नावावर जमा झाला. ( Jonny Bairstow and Jason Roy ) या दोघांनी इयॉन मॉर्गन व जो रूट ( १२) यांचा विक्रम मोडला. जो रुट व जेन रॉय यांच्या नावावर ७ शतकी भागीदारी आहेत. १७व्या षटकात या जोडीचा ताळमेळ तुटला अन् जेसन रॉयला ( ५५) धावबाद होऊन माघारी जावं लागलं. या खेळीत त्यानं ७ चौकार व १ षटकार खेचला. रोहित शर्मानं सुरेख फिल्डिंग करताना टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. 
पाहा व्हिडीओ..


Web Title: IND vs ENG, 2nd ODI : Brilliant fielding by Rohit Sharma, break 110 runs opening partnership, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.