India vs England, 2nd ODI : ट्वेंटी-२० मालिकेत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलनं ( KL Rahul) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावले. लोकेशचे वन डे क्रिकेटमधील हे पाचवे शतक ठरले. आज त्यानं कर्णधार विराट कोहलीसह ( Virat Kohli) १२१ धावांची भागीदारी करताना टीम इंडियाची गाडी रुळावर आणली आणि त्यानंतर रिषभ पंतसह ( Rishab Pant) चौथ्या विकेटसाठी ८० चेंडूंत ११३ धावांची आक्रमक भागीदारी पूर्ण केली. पण, त्याची खेळी ११४ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह १०८ धावांवर टॉम कुरननं संपुष्टात आणली. रिषभ पंत सुसाट सुटला होता. त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवताना संघाला ५० षटकांत ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा करून दिला. 2nd odi ind vs eng Live udates Score Mca Stadium अम्पायरच्या चुकीच्या निर्णयामुळे टीम इंडियाला फटका; रिषभ पंत नाराज, नेटिझन्स खवळले
शिखर धवनला ( Shikhar Dhawan) आज आपयश आलं. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या रिले टॉप्लीनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. धवन ( ४) स्लीपमध्ये बेन स्टोक्सच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर सॅम कुरननं इंग्लंडला मोठी विकेट मिळवून दिली. रोहित शर्मा ( २५) ९व्या षटकात कुरनच्या गोलंदाजीवर आदिल राशिदच्या हाती झेल देऊन बाद झाला. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. विराटपाठोपाठ लोकेशनंही अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांनी १४१ चेंडूंत १२१ धावा जोडल्या. विराट कोहली ७९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून ६६ धावांवर आदिल राशिदच्या गोलंदाजीवर बाद झाला. 2nd odi ind vs eng Live Score, 2nd odi ind vs eng Live updates
रिषभनं ४० चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७७ धावा चोपल्या. टॉम कुरन यानं टाकलेल्या ४७व्या षटकात जेसन रॉयनं त्याचा कॅच घेतला. रिषभ माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा धावांचा वेग थोडा मंदावला. इंग्लंडचा गोलंदाज टॉम कुरननं १० षटकांत ८३ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. आदिल राशिद व सॅम कुरन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 2nd ODI live, 2nd odi ind vs eng Live, 2nd odi ind vs eng Live Score हार्दिक पांड्यानं १६ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ३५ धावा चोपल्या. रिसे टॉप्लीनं ५० धावांत २ विकेट्स घेतल्या.