India vs England, 2nd ODI : जेसन रॉय ( Jason Roy) व जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी दमदार सुरूवात करून देताना इंग्लंडचा पाया मजबूत केला. बेअरस्टोनंही शतक झळकावले आणि त्याला बेन स्टोक्सची ( Ben Stokes) तोलामोलाची साथ मिळाली. खेळपट्टीवर जम बसलेल्या या जोडीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. भुवनेश्वर कुमारनं ( Bhuvneshwar Kumar) १७५ धावांची ही भागीदारी मोडली. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णानं ( Prasidh Krishna) शतकवीर बेअरस्टोला १२४ धावांवर माघारी पाठवले आणि जॉस बटलरलाही भोपळ्यावर बाद केले. त्यामुळे सामन्यात पुन्हा चुरस रंगताना दिसली. पण, इंग्लंडनं हा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. इंग्लंडनं वन डे क्रिकेटमध्ये भारताला प्रथमच त्यांच्या घरच्या मैदानावर ३००+ धावांचा यशस्वी पाठलाग करून पराभूत केले. 2nd odi ind vs eng Live udates Score Mca Stadium ९९ धावांवर बाद झाल्यानंतर बेन स्टोक्सनं मागितली वडिलांची माफी, Emotional Video
इंग्लंडची पुन्हा एकदा शतकी सलामी...जॉनी बेअरस्टो व जेसन रॉय यांनी पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६व्या षटकात शतकी भागीदारी पूर्ण केली. १७व्या षटकात या जोडीचा ताळमेळ तुटला अन् जेसन रॉयला ( ५५) धावबाद होऊन माघारी जावं लागलं. खेळपट्टीवर जम बसलेल्या बेन स्टोक्सनं भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. बेअरस्टोनं वन डे कारकिर्दीतील ११वे शतक झळकावले. स्टोक्स आज भलत्याच फॉर्मात होता. भुवनेश्वर कुमारनं त्याला रिषभ पंतच्या हाती झेलबाद केले. स्टोक्सनं ५२ चेंडूंत ४ चौकार व १० षटकारांची आतषबाजी करताना ९९ धावा चोपल्या. बेअरस्टोसह दुसऱ्या विकेटसाठी त्यानं ११७ चेंडूंत १७५ धावांची भागीदारी केली. बेन स्टोक्सला आली लहर अन् केला कहर; १४ चेंडूंत चोपल्या ७६ धावा, पण शतकाला हुकला
भुवी, प्रसिद्ध कृष्णानं सामन्यात आणली चुरसभुवीनं स्टोक्सला माघारी पाठवल्यानंतर प्रसिद्ध कृष्णानं पुढच्याच षटकात दोन धक्के दिले. प्रसिद्धनं शतकवीर जॉनी बेअरस्टोला बाद केलं. बेअरस्टोनं ११२ चेंडूंत ११ चौकार व ७ षटकारांसह १२४ धावा केल्या. त्यापाठोपाठ कर्णधार जोस बटलरही भोपळ्यावर बाद झाला. पण, डेवीड मलान व लायम लिव्हिंगस्टोन यांनी इंग्लंडचा विजय पक्का केला. मलान १६ व लिव्हिंगस्टोन २७ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडनं ६ विकेट्स व ३९ चेंडू राखून हा सामना जिंकला. Our or Not!; बेन स्टोक्सबाबतच्या या निर्णयानं विराट कोहली भडकला, मैदानावर बसून अम्पायरला समजवायला लागला
टीम इंडियाच्या फलंदाजांनी दाखवला दम...लोकेश राहुलचे ( KL Rahul) शतक अन् विराट कोहली ( Virat Kohli) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा केला. लोकेशनं चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह १०८ धावांची खेळी केली. विराटही ७९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून ६६ धावांवर माघारी परतला. रिषभनं ४० चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७७ धावा चोपल्या. हार्दिक पांड्यानं १६ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ३५ धावा केल्या. विराट व लोकेश यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४१ चेंडूंत १२१ धावा,तर रिषभ व लोकेश यांनी चौथ्या विकेटसाठी ८० चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. 2nd ODI live, 2nd odi ind vs eng Live