India vs England, 2nd ODI : भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) नुकताच विवाहबंधनात अडकला. २७ वर्षीय जसप्रीतनं लग्नासाठी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून सुट्टी मागितली होती आणि त्यानंतर तो ट्वेंटी-२० व वन डे मालिकेतही खेळत नाही. त्यानं १५ मार्चला स्पोर्ट्स रिप्रेझेंटेटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्याशी लग्न केलं. जसप्रीत सुट्टीवर असल्यानं टीम इंडियाकडून खेळत नाही आणि आता तो थेट आयपीएल ( IPL 2021) मध्ये मैदानावर उतरणार आहे. पण, बुमराहची पत्नी कामावर रुजू झाली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ती स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर एक्स्ट्रा इनिंग या खास कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसली. त्यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी जसप्रीत बुमराह कुठेय असा सवाल केला. विराट कोहलीचा विक्रम, बेन स्टोक्सला तंबी अन् तासाभरात टीम इंडियानं गमावले सलामीवीर
''प्रेम, जर ते योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे आणि या नव्या प्रवासाच्या बातमी तुमच्यासोबत वाटताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूरा आहे,'' असे दोघांनी ट्विट केलं होतं.
सुवर्ण पदक विजेती संजना
संजनाचा जन्म ६ मे १९९१ रोजी पुणे शहरात झाला. शालेय शिक्षण बिशप शाळेमध्ये झाले. त्यानंतर सिम्बॉयसिसमधून बी.टेक. पूर्ण केले. सिम्बॉयसिसमध्ये असताना संजनाने सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर संजना आयटी आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्राकडे वळली. त्याचवेळी अँकर म्हणून काम करायला सुरुवात केली.
Web Title: IND vs ENG, 2nd ODI : Fans rejoice as Sanjana Ganesan resumes work for first time since marrying Jasprit Bumrah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.