Join us

हिटमॅन इज बॅक! रोहित शर्मानं कडक फटकेबाजी करत ठोकली 'फिफ्टी'

आधी कॅप्टन्सीचं अर्धशतक, मग भात्यातून आली कडक फिफ्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 19:17 IST

Open in App

इंग्लंड विरुद्धच्या कटकच्या मैदानातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अखेर रोहित शर्माला सूर गवसला आहे. दमदार फटकेबाजी करत त्याने वनडे कारकिर्दीतील ५८ वे अर्धशतक झळकावले. ३० चेंडूत रोहित शर्मानं ४ चौकार आणि ४ षटकार मारत अर्धशतकाला गवसणी घातली. सातत्याने अपयशाचा सिलसिला खंडीत करत रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्या जुन्या अंदाजात बॅटिंग करताना दिसला. कॅप्टन रोहितसह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर टीम इंडियासाठी ही एक चांगली बातमी आहे. मैदानात उतरल्यावरच कॅप्टन्सीत अर्धशतक साजरे करणाऱ्या रोहितनं बॅटिंगमधील आपला तोरा दाखवून दिलाय. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रोहित-शुबमन जोडी जमली!

इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना ३०४ धावा करत भारतीय संघासमोर ३०५ धावांचे टार्गेट सेट केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली, एका बाजूला रोहित शर्मा आक्रमक फटकेबाजी करताना दिसला. दुसरीकडे उप कॅप्टन शुबमन गिलनं संयमी पवित्रा घेत त्याला साथ देण्यावर भर दिला. बऱ्याच दिवसांनी सलामी जोडी प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरताना दिसली. 

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्या भात्यातून आली  होती शेवटची फिफ्टी, पण...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग १० डावात रोहित शर्माला अर्धशतकापर्यंत पोहचता आले नव्हते. बॅटिंगमधील चुका सुधारत अखेर रोहितनं अर्धशतकी डाव साधला आहे. ३७ वर्षीय बॅटरनं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बेंगळुरू येथे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे अर्धशतक झळकावले होते. दुसऱ्या डावात त्याने ६३ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. या सामन्यातही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. 

मागील १० डावात ७ वेळा एकेरी धावसंख्येवर परतला होता तंबूत 

मागील १० डावात तब्बल सात वेळा तो एकेरी धावसंख्येवर तंबूत परतला होता. नागपूरच्या मैदानातील पहिल्या वनडे सामन्यात तो फक्त दोन धावा काढून तंबूत परला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाच डावात त्याच्या खात्यात फक्त ३१ धावा आल्या होत्या. सातत्यपूर्ण अपयशामुळे रोहित सोशल मीडियावर ट्रोल झाला. नेटकऱ्यांनी त्याला निवृत्तीचा सल्लाही दिला. पण शेवटी त्याने आपल्या भात्यातील धमक दाखवत ट्रोलर्सची तोंड बंद करणारी झक्का खेळी आहे. 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंड