IND vs ENG, 2nd ODI : भारत-इंग्लंड मालिकेत सातत्यानं अम्पायरच्या निर्णयाची चर्चा राहिली आहे. Soft Signal, Umpires Call's या नियमांवरून नाराजी व्यक्त होत असताना दुसऱ्या वन डे सामन्यातही अशाच एका निर्णयाचा टीम इंडियाला फटका बसला. ४० व्या षटकात टॉम कुरनच्या अखेरच्या चेंडूवर रिषभ पंतनं ( Rishabh Pant) रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजानं अपील केल्यानंतर मैदानावरील अम्पायरनं रिषभला LBW बाद दिले. पण चेंडू बॅटला लागल्याचं सांगत रिषभनं DRS घेतला. रिषभनं मारलेला तो चेंडू यष्टिरक्षक जोस बटलरला चकवा देत सीमा पार गेला. DRS मध्ये चेंडू खरंच बॅटला लागल्याचे दिसले आणि मैदानावरील अम्पायरला निर्णय बदलावा लागला. पण, त्याचबरोबर भारताला चार धावा मिळाल्या नाही. कारण अम्पायरनं रिषभला बाद ठरवले होते. रिषभनं या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि सोशल मीडियावर नेटिझन्सनी धुलाई केली. 2nd odi ind vs eng, ind vs eng Live, 2nd odi ind vs eng
शिखर धवनला ( Shikhar Dhawan) आज आपयश आलं. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या रिले टॉप्लीनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. धवन ( ४) स्लीपमध्ये बेन स्टोक्सच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर सॅम कुरननं इंग्लंडला मोठी विकेट मिळवून दिली. रोहित शर्मा ( २५) ९व्या षटकात कुरनच्या गोलंदाजीवर आदिल राशिदच्या हाती झेल देऊन बाद झाला. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. विराटपाठोपाठ लोकेशनंही अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांनी १४१ चेंडूंत १२१ धावा जोडल्या. विराट कोहली ७९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून ६६ धावांवर आदिल राशिदच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहली-लोकेश राहुल यांची शतकी भागीदारी, कर्णधारानं मोडला ग्रॅमी स्मिथचा मोठा विक्रम
रिषभ पंत ( Rishabh Pant) त्याच्या आक्रमक अंदाजातच दिसला. त्यानं लोकेश राहुलसह ४४ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रिषभनं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं आणि त्यात ३ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. 2nd ODI live, 2nd odi ind vs eng Live, 2nd odi ind vs eng Live Score
Web Title: IND vs ENG, 2nd ODI : India & Rishabh Pant misses out four runs because of an umpire's mistake, know what happened
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.