India vs England, 2nd ODI : वन डे मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या इंग्लंड संघाला दुसऱ्या वन डे सामन्यापूर्वी दोन मोठे धक्के बसले. कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) आणि सॅम बिलिंग यांना दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यात इंग्लंडच्या संघात आज तीन बदल पाहायला मिळाले. मॉर्गन व बिलिंग यांच्या जागी संघात डेवीड मलान ( Dawid Malan ) व रिसे टॉप्ली ( Reece Topley ) यांना संधी मिळाली, तर लायम लिव्हिंगस्टोन ( Liam Livingstone) हा आजच्या सामन्यातून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. लिव्हिंगस्टोनला मैदानावर उतवरून इंग्लंडनं मोठा डाव टाकला आहे. लिव्हिंगस्टोनं ५०-५० षटकांच्या सामन्यात १३८ चेंडूंत ३५० धावा चोपल्या होत्या आणि त्याच्या विक्रमी खेळीचं जगभरात कौतुक झालं होतं. 2nd ODI live, 2nd odi ind vs eng Live, 2nd odi ind vs eng Live Score
इंग्लंडचा संघ - जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, डेवीड मलान, जोस बटलर, लायन लिव्हिंगस्टोन, मोइन अली, सॅम कुरन, टॉम कुरन, आदिल राशिद, रिस टॉप्ली
१३८ चेंडूंत ३५० धावा
लिव्हिंगस्टोन हा भारतासाठी मोठा खतरा ठरू शकतो. आक्रमक फलंदाजीसोबतच तो ऑफ व लेग स्पिन गोलंदाजीही करतो. २७ वर्षीय लिव्हिंगस्टोननं ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी केली आहे. उपविजेता पर्थ स्कॉचर्स संघाकडून खेळताना त्यानं १४ सामन्यांत १३४च्या स्ट्राईक रेटनं ४२६ धावा चोपल्या आहेत. या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत तो सातव्या क्रमांकावर आहेत. त्यानं २८ षटकार खेचले होते आणि पाच विकेटही घेतल्या होत्या.
लिव्हिंगस्टोन इंग्लंडकडून दोन ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. २०१७मध्ये त्यानं पदार्पम केलं, परंतु संघातील स्थान कायम राखण्यात तो अपयशी ठरला. लिव्हिंगस्टोननं २०१५मध्ये Nantwich CC क्लबकडून ५० षटकांच्या सामन्यांत १३८ चेंडूंत ३५० धावा चोपल्या होत्या. लिव्हिंगस्टोननं ५५ लिस्ट एक क्रिकेटमध्ये १ शतक व १० अर्धशतकांसह १५५२ धावा केल्या आहेत आणि २३ विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं ५६ सामन्यांत १५ अर्धशतकं व ७ शतकं आहेत आणि २९९२ धावा व ३९ विकेट्स आहेत.
भारतीय संघात एक बदल, रिषभ पंतला संधी पहिल्या वन डे सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma) व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांना दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. श्रेयसची दुखापत गंभीर होती आणि त्यानं मालिकेतूनच माघार घेतली. त्याच्या जागी दुसऱ्या वन डे सामन्यात कोणाला संधी मिळेल, याची उत्सुकता होती. ट्वेंटी-२० मालिकेतून दमदार पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) संधी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. पण, कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) अंतिम ११मध्ये श्रेयसच्या जागी यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याला संधी दिली.भारतीय संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा