Virat Kohli, IND vs ENG 2nd ODI Live Updates : फेब्रुवारी २०२२नंतर विराट कोहली आज पहिली वन डे खेळणार; टीम इंडियाने जिंकली नाणेफेक

India vs England 2nd ODI Live Updates : भारताने आजचा वन डे सामना जिंकल्यास मागील ७ वर्षांतील इंग्लंडमधील भारताचा हा पहिला वन डे मालिका विजय असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 05:06 PM2022-07-14T17:06:15+5:302022-07-14T17:09:04+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 2nd ODI Live Updates : India win the toss and will bowl first, Virat Kohli back in place of Shreyas Iyer, know Playing XI  | Virat Kohli, IND vs ENG 2nd ODI Live Updates : फेब्रुवारी २०२२नंतर विराट कोहली आज पहिली वन डे खेळणार; टीम इंडियाने जिंकली नाणेफेक

Virat Kohli, IND vs ENG 2nd ODI Live Updates : फेब्रुवारी २०२२नंतर विराट कोहली आज पहिली वन डे खेळणार; टीम इंडियाने जिंकली नाणेफेक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd ODI Live Updates : भारताने पहिल्या वन डे सामन्यात  सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने आजचा वन डे सामना जिंकल्यास मागील ७ वर्षांतील इंग्लंडमधील भारताचा हा पहिला वन डे मालिका विजय असेल. लॉर्ड्सवरील  मागील १० वन डे सामन्यात पहिल्या डावात २६० ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. इंग्लंडने येथे मागील तीनही वन डे सामने जिंकलेले आहेत. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी २०२२ नंतर विराट कोहलीचे वन डे संघात पुनरागमन होत आहे. त्याच्यासाठी श्रेयस अय्यरला विश्रांती दिली गेली आहे. जानेवारी २०२०नंतर विराट, रोहित व जसप्रीत प्रथमच वन डे त सोबत खेळताना दिसणार आहेत.

भारताने पहिल्या वन डे सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवला. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्या समोर ( ६-१९) इंग्लंडचा संघ ११० धावांत तंबूत परतला. रोहित शर्मा ( ७६*) व शिखऱ धवन ( ३१*) या दोघांनी ११४ धावा करून १८.४ षटकांत हा सामना जिंकून दिला. त्यामुळे अन्य फलंदाजांना संधीच मिळाली नाही. त्यात बीसीसीआयने सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी विराटचे नेट्समध्ये फलंदाजी करतानाचे फोटो पोस्ट करून तो आजच्या सामन्यात खेळणार असल्याचे संकेत दिले आहे. अशात श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) बाकावर बसवले गेले आहे.


या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने शँम्पेनची बॉटल माजी कर्णधार इयॉन मॉर्गनला दिली. तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी इंग्लंडने वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. इंग्लंडच्या संघात कोणताच बदल झालेला नाही.     

भारतीय संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.

Web Title: IND vs ENG 2nd ODI Live Updates : India win the toss and will bowl first, Virat Kohli back in place of Shreyas Iyer, know Playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.