Rohit Sharma, IND vs ENG 2nd ODI Live Updates : रोहित शर्मा, रिषभ पंत 'Duck' वर बाद, शिखर धवनही परतला माघारी; विराट कोहलीनेही केले निराश, Video 

India vs England 2nd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या वन डे सामन्यातही उत्तम कामगिरी करताना इंग्लंडला २४६ धावांत गुंडाळले. फिरकीपटू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 10:41 PM2022-07-14T22:41:58+5:302022-07-14T22:43:36+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 2nd ODI Live Updates : Reece Topley gets Rohit Sharma ( 0)  & Shikhar Dhawan ( 9), Rishabh Pant, Virat Kohli also gone, India in trouble with 31 for 4, Video  | Rohit Sharma, IND vs ENG 2nd ODI Live Updates : रोहित शर्मा, रिषभ पंत 'Duck' वर बाद, शिखर धवनही परतला माघारी; विराट कोहलीनेही केले निराश, Video 

Rohit Sharma, IND vs ENG 2nd ODI Live Updates : रोहित शर्मा, रिषभ पंत 'Duck' वर बाद, शिखर धवनही परतला माघारी; विराट कोहलीनेही केले निराश, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या वन डे सामन्यातही उत्तम कामगिरी करताना इंग्लंडला २४६ धावांत गुंडाळले. फिरकीपटू युजवेंद्र चहलने ४७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. इंग्लंडचे गोलंदाजही कंबर कसून मैदानावर उतरलेले दिसले. पहिल्या काही षटकांत भारताच्या सलामीवीरांना त्यांनी धावच करू दिली नाही. त्यानंतर रिसे टॉप्लीने दोन धक्के दिले. रिषभ पंतचे प्रमोशन झाले, परंतु त्यालाही भोपळा फोडता आला नाही. सुरेख फटके मारून डावाची सुरूवात करणाऱ्या विराट कोहलीला आजही अपयश आले. भारताचे ४ फलंदाज ३१ धावांत माघारी परतले.


जेसन रॉय ( २३) व जॉनी बेअरस्टो ( ३८)  या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली, परंतु हार्दिक पांड्याने ही जोडी तोडली. त्यानंतर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांना फारकाळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. जो रूट ( ११), बेन स्टोक्स ( २१), जोस बटलर ( ४) हे झटपट माघारी परतले. चहलने इंग्लंडच्या बेअरस्टो, रूट, स्टोक्स व मोईन अली या प्रमुख फलंदाजांना बाद केले. लिएम  लिव्हिंगस्टोन ( ३३) व मोईन अली यांनी ४६ धावांची भागीदारी करून डाव सारवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. अलीने त्यानंतर डेव्हिड विलिसह संघर्ष करताना संघाला दोनशेपार नेले. अलीने ६४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या. विलि ४१ धावांवर बाद झाला. मोहम्मद  शमी ( १- ४८), हार्दिक पांड्या ( २- २८), जसप्रीत बुमराह ( २-२८), प्रसिद्ध कृष्णा ( १-५३) यांनी चांगली गोलंदाजी केली.  

रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीला इंग्लंडच्या गोलंदाजांनी मोकळेपणाने फटके मारू दिले नाही. २५ चेंडूनंतर भारताने बॅटीतून पहिली धाव मिळवली आणि तिही विराट कोहलीच्या चौकाराने ती आली. रोहित १० चेंडूंत एकही धाव न करता रिसे टॉप्लीच्या गोलंदाजीवर LBW झाला. त्यानंतर विराटने मिड ऑन, मिड ऑफ  व कव्हर ड्राईव्ह असे चौकार खेचून उपस्थितांची दाद मिळवली. दुसऱ्या बाजूने धवन  चाचपडत खेळत होता. ९व्या षटकात टॉप्लीच्या गोलंदाजीवर धवन ( ९) यष्टिरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. भारताला २७ धावांत दुसरा धक्का बसला. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव येणे अपेक्षित होते, परंतु रिषभ पंतला वरच्या क्रमांकावर पाठवण्यात आले. पण, ५ चेंडू खेळून पंत भोपळ्यावर बाद झाला. ब्रायडन कार्सच्या फुलटॉसवर पंत झेलबाद झाला. भारताने २९ धावांत ३ फलंदाज गमावले. डेव्हिड विलिने विराटला ( १६) बाद करून भारताला चौथा धक्का दिला. 
 

Web Title: IND vs ENG 2nd ODI Live Updates : Reece Topley gets Rohit Sharma ( 0)  & Shikhar Dhawan ( 9), Rishabh Pant, Virat Kohli also gone, India in trouble with 31 for 4, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.