Join us  

MS Dhoni vs Suresh Raina, IND vs ENG 2nd ODI Live Updates : महेंद्रसिंग धोनी - सुरेश रैना यांच्यात खरंच वाद सुरू आहे का?; लॉर्ड्सवर मिळाले उत्तर, Photo Viral 

India vs England 2nd ODI Live Updates : भारताने आजचा वन डे सामना जिंकल्यास मागील ७ वर्षांतील इंग्लंडमधील भारताचा हा पहिला वन डे मालिका विजय असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 7:15 PM

Open in App

India vs England 2nd ODI Live Updates : भारताने पहिल्या वन डे सामन्यात  सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने आजचा वन डे सामना जिंकल्यास मागील ७ वर्षांतील इंग्लंडमधील भारताचा हा पहिला वन डे मालिका विजय असेल. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि गोलंदाजांनी पुन्हा एकदा त्याचा निर्णय योग्य ठरवलेला पाहायला मिळतोय. इंग्लंडचे चार फलंदाज ८७ धावांवर माघारी परतले आहे. लॉर्ड्सवर सुरू असलेल्या सामना पाहण्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह उपस्थित आहे. सचिन व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना एकत्र पाहून नेटिझन्स खुश झाले आहेत. असाच एक फोटो लॉर्ड्सवरून व्हायरल झाला आहे. त्यातून महेंद्रसिंग धोनी ( Ms Dhoni) व सुरेश रैना ( Suresh Raina) यांच्या वादाबाबात चर्चेला पुन्हा तोंड फोडले आहे.

विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये परतल्यामुळे श्रेयस अय्यरला विश्रांती दिली गेली आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने शँम्पेनची बॉटल माजी कर्णधार इयॉन मॉर्गनला दिली. तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी इंग्लंडने वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. इंग्लंडच्या संघात कोणताच बदल झालेला नाही. हा सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सवर सचिन तेंडुलकर व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हेही उपस्थित होते. सचिन व गांगुली यांना सोबत पाहून स्टेडियमवर जल्लोष झाला. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनीसुरेश रैना हेही लॉर्ड्सवर दिसले.

Mr. IPL सुरेश रैनाला आयपीएल २०२२साठी झालेल्या लिलावात कोणीच वाली मिळाला नाही. सुरेश रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रैना चौथ्या क्रमांकावर आहे.  

आयपीएल २०२० पासून चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) आणि सुरेश रैना यांच्यात बिनसलेल्या संबंधाचे सारेच साक्षीदार आहोत. त्यात धोनी व रैना यांच्यातही खटके उड्याल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, आज या दोघांना सोबत पाहून त्या चर्चांना पूर्णविराम नक्की लागला असेल.   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडसुरेश रैनामहेंद्रसिंग धोनीसचिन तेंडुलकरसौरभ गांगुली
Open in App