IND vs ENG 2nd ODI Live Updates : ना रिषभ पंत, ना हार्दिक पांड्या! आजच्या सामन्यात उप कर्णधार कोण आहे ते पाहा, BCCI ची घोषणा 

India vs England 2nd ODI Live Updates : भारत-इंग्लंड यांच्यातली दुसरी वन डे मॅच लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 06:28 PM2022-07-14T18:28:55+5:302022-07-14T18:29:55+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 2nd ODI Live Updates : Shikhar Dhawan is the vice-captain of the Indian team in the 2nd ODI, Hardik Pandya take 1st wicket england 1 for 41  | IND vs ENG 2nd ODI Live Updates : ना रिषभ पंत, ना हार्दिक पांड्या! आजच्या सामन्यात उप कर्णधार कोण आहे ते पाहा, BCCI ची घोषणा 

IND vs ENG 2nd ODI Live Updates : ना रिषभ पंत, ना हार्दिक पांड्या! आजच्या सामन्यात उप कर्णधार कोण आहे ते पाहा, BCCI ची घोषणा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd ODI Live Updates : भारत-इंग्लंड यांच्यातली दुसरी वन डे मॅच लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळवली जात आहे. भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यातही टीम इंडिया विजय मिळवेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो या इंग्लंडच्या सलामीवीरांनी सावध खेळ सुरू ठेवला होता, परंतु हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) त्याच्या पहिल्याच षटकात रॉयला ( २३) बाद केले व इंग्लंडला ४१ धावांवर पहिला धक्का दिला. 

विराट कोहलीचे ( Virat Kohli) पुनरागमन हा आजच्या सामन्यातील खरा चर्चेचा विषय होता. पण, बीसीसीआयने उप कर्णधारपदी नव्या खेळाडूची निवड करून आणखी एक विषय दिला.पहिल्या वन डे सामन्यात बीसीसीआयने संघाचा उप कर्णधारच ठेवला नव्हता. त्यामुळे आजच्या सामन्यातही तसेच चित्र पाहायला मिळेल, अशी शक्यता होती. 


पण, आजच्या सामन्यात रिषभ पंत व हार्दिक पांड्या यांच्याकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी न सोपवता बीसीसीआयने ती शिखऱ धवनच्या ( Shikhar Dhawan) खांद्यावर सोपवली आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने ही घोषणा केली. धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर वन डे मालिकेत खेळणार आहे. लोकेश राहुल हा टीम इंडियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार आहे. पण, दुखापतीमुळे तो अनुपस्थित नसल्याने ही जबाबदारी रिषभ किंवा हार्दिक या युवा खेळाडूंकडे दिली जाईल अशी अपेक्षा होती.
 
भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शिखर धवन ( उप कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.

Web Title: IND vs ENG 2nd ODI Live Updates : Shikhar Dhawan is the vice-captain of the Indian team in the 2nd ODI, Hardik Pandya take 1st wicket england 1 for 41 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.