Virat Kohli, IND vs ENG 2nd ODI Live Updates : विराट कोहली आज खेळणार, प्लेइंग इलेव्हनमधून 'हा' खेळाडू बाहेर जाणार?; BCCI ने दिले अपडेट्स

India vs England 2nd ODI Live Updates : भारताने पहिल्या वन डे सामन्यात  सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 04:47 PM2022-07-14T16:47:25+5:302022-07-14T16:49:14+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 2nd ODI Live Updates : Virat Kohli is fully fit and he will play today's 2nd ODI match against England at Lord's, BCCI Share his practice pic | Virat Kohli, IND vs ENG 2nd ODI Live Updates : विराट कोहली आज खेळणार, प्लेइंग इलेव्हनमधून 'हा' खेळाडू बाहेर जाणार?; BCCI ने दिले अपडेट्स

Virat Kohli, IND vs ENG 2nd ODI Live Updates : विराट कोहली आज खेळणार, प्लेइंग इलेव्हनमधून 'हा' खेळाडू बाहेर जाणार?; BCCI ने दिले अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd ODI Live Updates : भारताने पहिल्या वन डे सामन्यात  सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुखापतीमुळे विराट कोहलीला ( Virat Kohli) पहिल्या सामन्यात खेळता आले नव्हते. पण, आज तो खेळण्याची शक्यता बळावली आहे. BCCI ने विराटचे नेट्समध्ये फलंदाजी करतानाचे फोटो पोस्ट करून दुसऱ्या वन डेसाठी तयारी करताना विराट कोहली असे लिहिले आहे. त्यामुळे विराटच्या येण्याने पहिल्या वन डेतील प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल निश्चित पाहायला मिळेल. भारताने आजचा वन डे सामना जिंकल्यास मागील ७ वर्षांतील इंग्लंडमधील भारताचा हा पहिला वन डे मालिका विजय असेल. 

 रोहित शर्माला अल्लाहने जे टॅलेंट दिलंय, ते विराट कोहलीला नाही दिलं; पाकिस्तानच्या इमाम उल हकचं विधान

भारताने पहिल्या वन डे सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवला. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्या समोर ( ६-१९) इंग्लंडचा संघ ११० धावांत तंबूत परतला. रोहित शर्मा ( ७६*) व शिखऱ धवन ( ३१*) या दोघांनी ११४ धावा करून १८.४ षटकांत हा सामना जिंकून दिला. त्यामुळे अन्य फलंदाजांना संधीच मिळाली नाही. त्यात बीसीसीआयने सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी विराटचे नेट्समध्ये फलंदाजी करतानाचे फोटो पोस्ट करून तो आजच्या सामन्यात खेळणार असल्याचे संकेत दिले आहे. अशात श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) बाकावर बसवले जाऊ शकते. याशिवाय संघात कोणता बदल होण्याची शक्यता फार कमी आहे.  

ओव्हलच्या वेगवान माऱ्यास पोषक खेळपट्टीवर  जोस बटलर, ज्यो रूट, बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय व  लियाम लिव्हिंगस्टोन हे अपयशी ठरले होते. लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल मानली जाते. मात्र, भारतीय संघ फलंदाजी आणि गोलंदाजीत फॉर्ममध्ये असल्याने त्यांना विजयी आघाडी घेणे कठीण जाणार नाही. 

भारतीय संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.

Web Title: IND vs ENG 2nd ODI Live Updates : Virat Kohli is fully fit and he will play today's 2nd ODI match against England at Lord's, BCCI Share his practice pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.