Join us  

Yuzvendra Chahal, IND vs ENG 2nd ODI Live Updates : युजवेंद्र चहलने 'लॉर्ड्स' गाजवले, इंग्लंडच्या फलंदाजांना पाणी पाजले; १९८३सालचा मोडला विक्रम

India vs England 2nd ODI Live Updates : कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 9:03 PM

Open in App

India vs England 2nd ODI Live Updates : कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी पुन्हा एकदा त्याचा निर्णय योग्य ठरवलेला पाहायला मिळतोय. युजवेंद्र चहलने १० षटकांत ४७ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि १९८३ सालचा मोठा विक्रम मोडला.  जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो या इंग्लंडच्या सलामीवीरांनी सावध खेळ सुरू ठेवला होता, परंतु हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) त्याच्या पहिल्याच षटकात रॉयला ( २३) बाद केले. बेअरस्टो दुसऱ्या बाजूने चांगले फटके मारताना दिसला. त्याने १४व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या गोंलदाजीवर मारलेले दोन पुल शॉट सीमापार केले. बेअरस्टो हळुहळू धावांचा वेग वाढवत असताना १५व्या षटकात युजवेंद्र चहलने इंग्लंडला मोठा धक्का दिला. ३८ चेंडूंत ६ चौकारांसह ३८ धावा करणाऱ्या बेअरस्टोचा त्याने त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढच्या षटकात चहलने इंग्लंडच्या जो रूटला ( ११) फिरकीच्या जाळ्यात अडकवून LBW केले. रूटने घेतलेला DRS वाया गेला. 

मोहम्मद शमीने इंग्लंडला चौथा धक्का देताना जोस बटलरचा ( ४) त्रिफळा उडवला.  इंग्लंडचे चार फलंदाज ८७ धावांवर माघारी परतले. हा सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सवर सचिन तेंडुलकर व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हेही उपस्थित होते. सचिन व गांगुली यांना सोबत पाहून स्टेडियमवर जल्लोष झाला. त्याचवेळी महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैना हेही लॉर्ड्सवर दिसले. बेन स्टोक्सने चहलला चांगले रिव्हर्स स्वीप मारले, परंतु भारतीय गोलंदाजाने त्याला चकवले. स्टोक्स २१ धावांवर LBW झाला अन् इंग्लंडला १०२ धावांवर पाचवा धक्का बसला. 

मोईन अली व लिएम लिव्हिंगस्टोन यांनी ६व्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करताना इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. लिव्हिंगस्टोनने हार्दिकच्या गोलंदाजीवर ६, ४ असे फटके मारले आणि सलग तिसरा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. लिव्हिंगस्टोन २ चौकार व २ षटकारांसह  ३३ धावा करून माघारी परतला.  मोईन अलीने आज दमदार खेळ केला. त्याने ६४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४७ धावा करताना संघाला दोनशेपार पोहोचवले. पण, चहलने त्याची विकेट घेतली. 

लॉर्ड्सवरील वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. त्याने १९८३ साली नोंदवला गेलेला विक्रम मोडला. मोहिंदर अमरनाथ यांनी १९८३मध्ये १२ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या आणि ती  लॉर्ड्सवरील भारतीय गोलंदाजाची आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती. त्यानंतर आशिष नेहराने २००४मध्ये ( ३/२६) व हरभजन सिंगने २००४मध्ये ( ३/२८) तीन विकेट्स घेतल्या होत्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडयुजवेंद्र चहल
Open in App