IND vs ENG, 2nd ODI : श्रेयस अय्यरच्या जागी टीम इंडियात विराट कोहलीचा खास माणूस; नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं

India vs England, 2nd ODI : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात एक बदल पाहायला मिळत आहे. दुसऱ्या वन डे सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 01:15 PM2021-03-26T13:15:24+5:302021-03-26T13:16:42+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd ODI : Rishabh Pant comes in for Shreyas Iyer, England won the toss, know playing XI | IND vs ENG, 2nd ODI : श्रेयस अय्यरच्या जागी टीम इंडियात विराट कोहलीचा खास माणूस; नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं

IND vs ENG, 2nd ODI : श्रेयस अय्यरच्या जागी टीम इंडियात विराट कोहलीचा खास माणूस; नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 2nd ODI : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात एक बदल पाहायला मिळत आहे. दुसऱ्या वन डे सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या वन डे सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma) व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांना दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. श्रेयसची दुखापत गंभीर होती आणि त्यानं मालिकेतूनच माघार घेतली. त्याच्या जागी दुसऱ्या वन डे सामन्यात कोणाला संधी मिळेल, याची उत्सुकता होती. ट्वेंटी-२० मालिकेतून दमदार पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) संधी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात होती. पण, कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) अंतिम ११मध्ये श्रेयसच्या जागी यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याला संधी दिली.   2nd ODI live, 2nd odi ind vs eng Live भारत-इंग्लंड सामना पाहणे पडले महागात; IIM Ahmedabad च्या २८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

बटलरकडे आले नेतृत्त्व  
इंग्लंडसाठी मधल्या फळीच्या अपयशाची चिंता असून कर्णधार इयॉन मॉर्गन व सॅम बिलिंग्स यांच्या दुखापतीने अडचण वाढली आहे. मॉर्गन उर्वरीत दोन्ही सामन्यांत खेळणार नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडचे नेतृत्त्व जोस बटलर करेल. बिलिंग्सही शुक्रवारी खेळणार नाही. गुरुवारी थोडावेळ सराव केल्यानंतर मॉर्गनने खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट केले.  मोठी धावसंख्या उभारण्यासाठी किंवा धावांचा पाठलाग करण्यास बेन स्टोक्स, जोस बटलर आणि मोईन अली यांना फॉर्ममध्ये यावे लागेल. गोलंदाजीमध्येही इंग्लंडला अधिक जोर दाखवावा लागेल.  2nd odi ind vs eng Live Score, 2nd odi ind vs eng Live updates

भारतीय संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा


 इंग्लंडचा संघ - जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, डेवीड मलान, जोस बटलर, लायन लिव्हिंगस्टोन, मोइन अली, सॅम कुरन, टॉम कुरन, आदिल राशिद, रिस टॉप्ली 

 

Web Title: IND vs ENG, 2nd ODI : Rishabh Pant comes in for Shreyas Iyer, England won the toss, know playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.