Join us  

IND vs ENG, 2nd ODI : इंग्लंडच्या गोलंदाजानं डिवचलं, हार्दिक पांड्या जाब विचारण्यासाठी त्याच्या दिशेनं धावला अन्... Video

IND vs ENG, 2nd ODI : India vs England, 2nd ODI : लोकेश राहुलचे ( KL Rahul) शतक अन् विराट कोहली ( Virat Kohli) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या वन डे सामन्यात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 6:01 PM

Open in App

India vs England, 2nd ODI : लोकेश राहुलचे ( KL Rahul) शतक अन् विराट कोहली ( Virat Kohli) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या वन डे सामन्यात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा केला. लोकेशनं चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह १०८ धावांची खेळी केली. विराटही ७९ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून ६६ धावांवर माघारी परतला, तर रिषभनं कहर केला.  रिषभनं ४० चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७७ धावा चोपल्या. हार्दिक पांड्यानं १६ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ३५ धावा चोपून संघाच्या धावसंख्येत भर घातली. या सामन्यात हार्दिक व इंग्लंडचा गोलंदाज सॅम कुरन ( Sam Curran) यांच्यात शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळाली. कुरन काहीतरी पुटपुटला आणि त्याला जाब विचारण्यासाठी हार्दिक त्याच्यादिशेनं धावला. मैदानावरील पंचांनी मध्यस्थी केली. 2nd odi ind vs eng, ind vs eng Live, 2nd odi ind vs eng

शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) आज फार कमाल करू शकले नाहीत. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी  १४१ चेंडूंत १२१ धावा जोडल्या. विराट माघारी परतल्यानंतर रिषभनं आक्रमक खेळ केला. त्यानं लोकेशसह चौथ्या विकेटसाठी ८० चेंडूंत ११३ धावांची भागीदारी केली. इंग्लंडचा गोलंदाज टॉम कुरननं १० षटकांत ८३ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. आदिल राशिद व सॅम कुरन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रिसे टॉप्लीनं ५० धावांत २ विकेट्स घेतल्या.  लोकेश राहुलचे शतक; रिषभ पंतची आतषबाजी, चोपल्या १० चेंडूंत ५४ धावा 

हार्दिक व कुरन यांच्यातला वाद

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडहार्दिक पांड्यारिषभ पंतलोकेश राहुल