पठ्ठ्यानं वयाच्या ३३ व्या वर्षी वनडे पदार्पणासह रचला इतिहास; सॉल्ट ठरला वरुण चक्रवर्तीची पहिली शिकार

सॉल्ट फसला अन् वरुण चक्रवर्तीच्या नावे झाली वनडेतील पहिली विकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:30 IST2025-02-09T16:18:34+5:302025-02-09T16:30:38+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 2nd ODI Varun Chakravarthy picks up maiden wicket after achieving quirky record on debut | पठ्ठ्यानं वयाच्या ३३ व्या वर्षी वनडे पदार्पणासह रचला इतिहास; सॉल्ट ठरला वरुण चक्रवर्तीची पहिली शिकार

पठ्ठ्यानं वयाच्या ३३ व्या वर्षी वनडे पदार्पणासह रचला इतिहास; सॉल्ट ठरला वरुण चक्रवर्तीची पहिली शिकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवून देणाऱ्या वरुण चक्रवर्तीनं वनडेतही धमाकेदार पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले आहे. कटकच्या मैदानात टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना पुन्हा एकदा इंग्लंडच्या सलामी जोडीनं दमदार सुरुवात केली होती. ही जोडी कोण फोडणार? असा प्रश्न निर्माण झाला असताना रोहित शर्मानं चेंडू पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीकडे दिला. ३३ वर्षीय खेळाडूनंही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत वनडे कारकिर्दीतील पहिली विकेट घेत भारतीय संघाला पहिलं आणि महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

फिलिप सॉल्टच्या रुपात मिळवलं वनडेतील पहिलं यश

इंग्लंडचा स्फोटक बॅटर फिलिप आणि बेन डकेड या जोडीनं कडकच्या मैदानात आपल्या संघाला दमदार सुरुवात करुन दिली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. इंग्लंडच्या डावाच्या ११ व्या षटकात वरुण चक्रवर्तीनं फिल सॉल्टला आपल्या जाळ्यात अडकवलं. तो मिड ऑनच्या दिशेनं फटका मारताना चुकला अन् जड्डूं कोणतीही चूक न करता झेल टिपला. सॉल्टनं २९ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले.

पदार्पणाची कॅप मिळताना नावे झाला हा विक्रम

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात कुलदीप यादवला विश्रांती देत वरुण चक्रवर्तीला पदार्पणाची संधी मिळाली. फारूख इंजिनिअर या दिग्गजानंतर वनडेत पदार्पण करणारा भारताचा तो दुसरा वयस्क खेळाडू आहे. फारुख इंजिनिअर यांनी १९७४ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या लीड्स मैदानात ३६ वर्षे १३८ दिवस वय असताना वनडेत पदार्पण केले होते. वरुण चक्रवर्तीनं कटकच्या मैदानात ३३ वर्षे आणि १६४ दिवस वय असताना वनडेत पदार्पणाची संधी मिळालीये. 

लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरीसह गोलंदाजी करणारे गोलंदाज (५० पेक्षा अधिक विकेट्स) 

  • १४,१३ -वरुण चक्रवर्ती
  • १४.९१- चानुका दिलशान
  • १५.८३- राजेंद्र धनराज 
  • १६.०५ - कीथ बॉयस
  • १६..१०- अली खान

Web Title: IND vs ENG 2nd ODI Varun Chakravarthy picks up maiden wicket after achieving quirky record on debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.