Join us  

IND vs ENG, 2nd T20, Ishan Kishan : पदार्पणातच इशान किशनचा धमाका; २८ चेंडूंत अर्धशतक अन् १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी 

IND vs ENG, 2nd T20 : Ishan Kishan पदार्पणाच्या सामन्यातच इशान किशननं ( Ishan Kishan) धमाका उडवला. लोकेश राहुल ( KL Rahul ) सोबत पहिल्याच सामन्यात सलामीला खेळण्याची संधी मिळाल्याचं दडपण न घेता त्यानं बेधडक फटकेबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 10:01 PM

Open in App

Ind Vs Eng 2nd T20 Match Today : पदार्पणाच्या सामन्यातच इशान किशननं ( Ishan Kishan) धमाका उडवला. लोकेश राहुल ( KL Rahul ) सोबत पहिल्याच सामन्यात सलामीला खेळण्याची संधी मिळाल्याचं दडपण न घेता त्यानं बेधडक फटकेबाजी केली. लोकेश पहिल्याच षटकात माघारी परतल्यानंतर त्यानं कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासह ५६ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी केली. इशाननं त्याच्या आक्रमक शैलीत दोन खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं २८ चेंडूत शतक पूर्ण करताना ५ चौकार व ४ षटकार खेचले. पण, ३२व्या चेंडूवर त्याला पायचीत होऊन माघारी परतावे लागले. त्यानं या धडाकेबाज खेळीनं २०११च्या अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) विक्रमाशी बरोबरी केली. पदार्पणाच्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.  Ishan Kishan smashes 28-ball half century on debut with back to back to Sixes  भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar  Kumar) यानं तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. जेसन रॉय ( Jason Roy) याला अन्य फलंदाजांनी चांगली साथ दिली. इयॉन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांनी चांगला खेळ करताना इंग्लंडला ६ बाद १६४ धावांपर्यंत पल्ला गाठून दिला. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. शार्दूलनं २०व्या षटकात केवळ ६ धावा दिल्या. जेसन रॉय व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या डेवीड मलान यांनी ६४ धावांची भागीदारी करून इंग्लंडची गाडी रूळावर आणली. युझवेंद्र चहलनं ही भागीदारी तोडली आणि मलानला ( २४) बाद केलं. जेसन रॉय ( ४६) व  जॉनी बेअरस्टो ( २०) पाठोपाठ माघारी परतले. वॉशिंग्टन सुंदरनं ( Washington Sunder) या दोघांना बाद केलं. इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) भारतीय गोलंदाजांची धुलाई करेल असे वाटत होते, परंतु शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) त्याचा अडथळा दूर केला. मॉर्गन २८ धावांवर बाद झाला. बेन स्टोक्सनं २४ धावा केल्या. 

लोकेश राहुल याही सामन्यात अपयशी ठरला. तो पहिल्या  षटकाच्या सहाव्या चेंडूवर भोपळ्यावर बाद झाला. पण, पदार्पणवीर इशान किशन ( Ishan Kishan) यानं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. विराट कोहलीचीही बॅट आज फॉर्मात होती आणि त्यानं इशानसह दुसऱ्या विकेटसाठी झटपट अर्धशतकी भागीदारी केली. ४० धावांवर इशानला बेन स्टोक्सनं जीवदान दिलं, आदिल राशिदच्या गोलंदाजीवर त्यानं सोपा झेल सोडला. राशिदच्या गोलंदाजीवर त्यानं खणखणीत षटकार खेचले. १ बाद शून्यवरून त्यानं टीम इंडियाला २ बाद ९४ धावांपर्यंत मजल मारून दिली. 

इशानचा विक्रम- ट्वेंटी-20 पदार्पणात चार षटकार खेचणारा पहिला भारतीय - अजिंक्य रहाणेनंतर ६१ धावा ( ३९) वि. इंग्लंड, २०११ ट्वेंटी-20 पदार्पणात अर्धशतक झळकावणारा दुसरा भारतीय.  

युवराज सिंगनं केलं कौतुक बिनधास्त, बेधडक. इशान किशनचे धडाकेबाज पदार्पण.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडअजिंक्य रहाणेइशान किशन