Join us  

IND vs ENG, 2nd T20, Virat Kohli : टीम इंडियाची मालिकेत बरोबरी; विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड

IND vs ENG, 2nd T20 : India wins by 7 wicketsइशाननं त्याच्या आक्रमक शैलीत दोन खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं २८ चेंडूत शतक पूर्ण करताना ५ चौकार व ४ षटकार खेचले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 10:37 PM

Open in App

Ind Vs Eng 2nd T20 Match Today : पदार्पणाच्या सामन्यातच इशान किशननं ( Ishan Kishan) धमाका उडवला. लोकेश राहुल ( KL Rahul ) सोबत पहिल्याच सामन्यात सलामीला खेळण्याची संधी मिळाल्याचं दडपण न घेता त्यानं बेधडक फटकेबाजी केली. लोकेश पहिल्याच षटकात माघारी परतल्यानंतर त्यानं कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासह ५६ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी केली. विराटनंही नाबाद ७३ धावांची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. टीम इंडियानं १७.५ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात १६६ धावा केल्या. ( Virat Kohli becomes the first batsman to score 3,000 runs in T20Is)  

इंग्लंडच्या जेसन रॉय ( ४६) याला अन्य फलंदाजांनी चांगली साथ दिली. इयॉन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांनी चांगला खेळ करताना इंग्लंडला ६ बाद १६४ धावांपर्यंत पल्ला गाठून दिला. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. शार्दूलनं २०व्या षटकात केवळ ६ धावा दिल्या. डेवीड मलान ( २४), जॉनी बेअरस्टो ( २०), इयॉन मॉर्गन ( २८) आणि  बेन स्टोक्स ( २४) यांनी चांगला खेळ केला. 

लोकेश राहुल याही सामन्यात अपयशी ठरला. तो पहिल्या  षटकाच्या सहाव्या चेंडूवर भोपळ्यावर बाद झाला. पण, पदार्पणवीर इशान किशन ( Ishan Kishan) यानं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. विराट कोहलीचीही बॅट आज फॉर्मात होती आणि त्यानं इशानसह दुसऱ्या विकेटसाठी झटपट अर्धशतकी भागीदारी केली. ४० धावांवर इशानला बेन स्टोक्सनं जीवदान दिलं, आदिल राशिदच्या गोलंदाजीवर त्यानं सोपा झेल सोडला. राशिदच्या गोलंदाजीवर त्यानं खणखणीत षटकार खेचले. १ बाद शून्यवरून त्यानं टीम इंडियाला २ बाद ९४ धावांपर्यंत मजल मारून दिली.  पदार्पणातच इशान किशनचा धमाका; २८ चेंडूंत अर्धशतक अन् १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी 

त्यानंतर विराटनं अर्धशतक झळकावून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. विराटनं ४९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७३ धावा केल्या. रिषभ पंतनं १३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २६ धावा चोपल्या. विराटचे हे ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २६ वे अर्धशतक ठरले आणि यासह त्यानं रोहित शर्माचा ( २१ अर्धशतक) विक्रम मोडला. यासह त्यानं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ३००० धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीशार्दुल ठाकूररिषभ पंतरोहित शर्मा