Join us

भारत जिंकला म्हणून नव्हे, तर इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूमुळे काव्या मारन आनंदी, कोण आहे तो?

Kavya Maran SRH, Ind vs Eng 2nd T20 : इंग्लंडचा संघ हरला असला तरी 'त्या' खेळाडूने स्वत:ची छाप पाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 14:24 IST

Open in App

Kavya Maran SRH, Ind vs Eng 2nd T20 : टीम इंडियाने चेन्नईमध्ये इंग्लंडचा पराभव करत पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडला सलग दुसऱ्या टी२० मध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले. पण इंग्लंडच्या एका खेळाडूने चेन्नई टी२० मध्ये चमकदार कामगिरी केली. महत्त्वाची बाब म्हणजे, इंग्लंडच्या त्या खेळाडूची चांगली कामगिरी सनरायझर्स हैदराबाद (SRH) मालकीण काव्या मारन हिला नक्कीच खुश करणारी ठरतेय. त्याचे कारण या खेळाडूला IPL 2025 साठी काव्या मारनने आधीच १ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तो खेळाडू म्हणजे ब्रेडन कार्स (Brydon Carse).

ब्रेडन कार्सची अष्टपैलू कामगिरी

चेन्नईत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. भारतीय खेळाडूंकडून जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. पण इंग्लंडचा २९ वर्षीय खेळाडू ब्रेडन कार्सनेही या सामन्यात वर्चस्व गाजवले. प्रथम त्याने आपल्या बॅटने फटकेबाजी केली. यानंतर त्याने गोलंदाजीतही भेदक मारा केला. भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने ९ गडी गमावून १६५ धावा केल्या होत्या. ब्रायडनने १७ चेंडूत १८२च्या स्ट्राइक रेटने ३१ धावांची वेगवान खेळी केली. त्याच्यामुळे इंग्लंडला १५०चा टप्पा पार केला. या डावात त्याने तीन षटकार आणि एक चौकार मारला. यानंतर, कार्सने गोलंदाजीही केली. त्याने सूर्यकुमार यादव (१२), ध्रुव जुरेल (४) आणि वॉशिंग्टन सुंदर (२६) या फलंदाजांना बाद केले. कार्सने ४ षटकांत केवळ २९ धावा देत तीन बळी घेतल्या.

काव्या मारनने आधीच जिंकलीय बाजी

कार्सच्या अष्टपैलू कामगिरीमुळे टीम इंडियाला विजयासाठी निश्चितच संघर्ष करावा लागला, पण काव्या मारनसाठी त्याची खेळी आनंद देणारी ठरली. आयपीएलच्या दृष्टिकोनातून SRH आणि काव्याचा निर्णय योग्य ठरला.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादइंग्लंड