Ind Vs Eng 2nd T20 Match Today : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पहिली धाव घेताच चाहत्यांच्या जीवात जीव आला. मागील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांत विराट शून्यावर बाद झाला होता आणि त्याच्या नावे नकोसा विक्रम नोंदवले गेले. पण, आज लोकेश राहुल ( KL Rahul) पहिल्याच षटकात माघारी परतल्यानंतर विराट मैदानावर आला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम नावावर केला. ( Fastest to 12000 international runs as captain)
पहिल्याच षटकात विकेट पडूनही इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या ट्वेंटी-20 ( India vs England 2nd T20) सामन्यात टीम इंडियाविरुद्ध आव्हानात्मक धावा उभ्या केल्या. भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) यानं तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. जेसन रॉय ( Jason Roy) याला अन्य फलंदाजांनी चांगली साथ दिली. इयॉन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांनी चांगला खेळ करताना इंग्लंडला ६ बाद १६४ धावांपर्यंत पल्ला गाठून दिला. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. शार्दूलनं २०व्या षटकात केवळ ६ धावा दिल्या. BCCIनं माझा सल्ला ऐकला, मुंबई इंडियन्सच्या अधिक खेळाडूंना चान्स दिला - मायकेल वॉन
भुवीनं पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोस बटलरला (०) पायचीत करून माघारी पाठवले. त्यानंतर जेसन रॉय व जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या डेवीड मलान यांनी ६४ धावांची भागीदारी करून इंग्लंडची गाडी रूळावर आणली. युझवेंद्र चहलनं ही भागीदारी तोडली आणि मलानला ( २४) बाद केलं. जेसन रॉय ( ४६) व जॉनी बेअरस्टो ( २०) पाठोपाठ माघारी परतले. वॉशिंग्टन सुंदरनं ( Washington Sunder) या दोघांना बाद केलं. इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) भारतीय गोलंदाजांची धुलाई करेल असे वाटत होते, परंतु शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) त्याचा अडथळा दूर केला. मॉर्गन २८ धावांवर बाद झाला. बेन स्टोक्सनं २४ धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे कर्णधार१५,४४० - रिकी पाँटिंग ( सरासरी ४५.५४)१४, ८७८ ग्रॅमी स्मिथ ( सरासरी ४३.१२) १२,०२* विराट कोहली ( सरासरी ६१.८६) ११,५६१ स्टीफन फ्लेमिंग११,२०७ महेंद्रसिंग धोनी
विराटनं सर्वात जलद १२००० आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या कर्णधाराचा मान पटकावला. त्यानं २२६ डावांत हा पल्ला सर केला. रिकी पाँटिंगला २८२ डाव व ग्रॅमी स्मिथ २९४ डाव खेळावे लागले.