ठळक मुद्देइंग्लंडचे ६ बाद १६४ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं १७.५ षटकांत ३ बाद १६६ धावा करून पार केलं इशान किशननं ३२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून ५६ धावांची खेळी केली.
Ind Vs Eng 2nd T20 Match Today : टीम इंडियानं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ७ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. इंग्लंडचे ६ बाद १६४ धावांचे लक्ष्य टीम इंडियानं १७.५ षटकांत ३ बाद १६६ धावा करून पार केलं. पदार्पणाची संधी मिळालेल्य इशान किशननं ( Ishan Kishan) ३२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून ५६ धावांची खेळी केली. लोकेश राहुलसोबत सलामीला आलेल्या इशाननं आत्मविश्वासानं खेळ केला. या सामन्यात विराटनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त ३००० धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. मागील काही सामन्यांत विराटची बॅट त्याच्यावर रुसली होती, पण या सामन्यापूर्वी विराटनं RCBचा सहकारी एबी डिव्हिलियर्स ( special chat with AB De Villiers just before today's game) याच्याशी चर्चा केली अन् त्याचा फॉर्म परतला. सामन्यानंतर विराटनंच याबाबतचा खुलासा केला. Ishan Kishan : पदार्पणातच इशान किशनचा धमाका; २८ चेंडूंत अर्धशतक अन् १० वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी
इंग्लंडच्या जेसन रॉय ( ४६), डेवीड मलान ( २४), जॉनी बेअरस्टो ( २०), इयॉन मॉर्गन ( २८) आणि बेन स्टोक्स ( २४) यांनी चांगला खेळ केला. त्यांनी इंग्लंडला ६ बाद १६४ धावांपर्यंत पल्ला गाठून दिला. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांत जबरदस्त कमबॅक केले. शार्दूल ठाकूरनं चांगली गोलंदाजी केली आणि इंग्लंडच्या धावांना लगाम लावली. Ind Vs Eng 2nd T20 Live Update Score
लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुल पुन्हा अपयशी ठरला. इशाननं विराटसह दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. तो माघारी परतल्यानंतर विराटनं अर्धशतक झळकावून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रिषभ पंतनं १३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २६ धावा चोपल्या. विराटचे हे ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २६ वे अर्धशतक ठरले आणि यासह त्यानं रोहित शर्माचा ( २५ अर्धशतक) विक्रम मोडला. यासह त्यानं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ३००० धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. Ind vs Eng 2nd T20 Live Match Today
विराट काय म्हणाला?
''आम्ही सर्व आघाड्यांवर आज चांगली कामगिरी केली आणि अखेरच्या पाच षटकांत केवळ ३४ धावा देत सामन्याला कलाटणी दिली. इशान किशनचे कौतुक करावे तितके कमी, पदार्पणातच त्यानं दमदार खेळ केला. तो बिनधास्त व्यक्ती आहे. त्याने अशीच फलंदाजी करत रहावी,'' असे विराटनं सांगितले. तो पुढे म्हणाला,''सामन्यापूर्वी मी एबी डिव्हिलियर्सशी बोललो आणि त्यानं मला चेंडूवर नजर ठेव, असा सल्ला दिला. मी तेच केलं.'' Ind Vs Eng 2nd T20 Match Today, Ind Vs Eng 2nd T20 Live Match
Web Title: IND vs ENG, 2nd T20 : Virat Kohli said he had a special chat with AB De Villiers just before today's game
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.