Mohammad Shami Team India Playing XI, Ind vs Eng 2nd T20 : टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली. यानंतर भारतीय संघ हेच सातत्य कायम राखण्याच्या निर्धाराने शनिवारी दुसऱ्या टी-२० सामन्यात चेपोंक स्टेडियमवर खेळेल. त्याचवेळी, या सामन्यात तरी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला खेळवणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
दुखापतीतून सावरून देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन केलेल्या शमीला बुधवारी पहिल्या सामन्यात खेळविण्यात आले नव्हते. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबतही पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याच वेळी, फिरकीस पोषक असलेल्या चेन्नईच्या खेळपट्टीवर त्याला संधी मिळाल्यास संघाबाहेर कोण जाणार हेदेखील पाहावे लागेल. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्या सामन्यात भेदक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला होता. त्यामुळे, शमीला खेळविल्यास संघाचा समतोल कसा राखला जाईल, हे पाहावे लागेल.
चेपॉकची खेळपट्टी फिरकीस पोषक असल्याने वरुण चक्रवर्ती, उपकर्णधार अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई या फिरकी त्रिकुटाचे स्थान जवळपास निश्चित आहे. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोन है फिरकीची जबाबदारी सांभाळतील. फलंदाजीत पुन्हा एकदा अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्याकडून वेगवान खेळीची अपेक्षा असेल. त्याच वेळी, कर्णधार सूर्यकुमार यादव याला जबाबदारपणे खेळावे लागेल.
नेटसमध्ये गाळला घाम, पण वेगवान मारा केला नाही
- अनुभवी वेगावान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या पुनरागमनाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. त्याला पहिल्या सामन्यात संधी न मिळाल्यानंतर दुसन्या सामन्यात शमीच्या संधी मिळेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
- त्याने शुक्रवारी संघाच्या सराव सत्रादरम्यान जवळपास एक तास कसून सराय केला. यावेळी त्याने सलग गोलंदाजी करत आपण पूर्ण तंदुरुस्त असल्याचे संकेत दिले.
- असे असले तरी, तो सराव सत्रादरम्यान ओर लावून मारा करत असल्याचे दिसून आले नाही. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याच्याविरुद्ध फलंदाज सहजपणे खेळताना दिसले.
...तर नितीशकुमार संघाबाहेर होणार!
- वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला अंतिम संघात स्थान मिळाले, तर तो अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी याची जागा घेऊ शकतो. पहिल्या सामन्यात नितीशकुमारला गोलंदाजीची संधीही मिळाली नव्हती.
- टी-२० विश्वविजेतेपदानंतर सूर्याला ११ डावांतून केवळ दोन अर्धशतके झळकावता आली आहेत. तिलक वर्माही पहिल्या सामन्यातील अपयश मागे टाकून आपली छाप पाडण्यास उत्सुक असेल.
- सामन्याचे स्थळ : एमए चिदंबरम स्टेडियम, चेपोक - चेन्नई
- सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ वाजल्यापासून
- थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स
- लाइव्ह स्ट्रीमिंग : डीस्ने-हॉटस्टार