Join us  

IND vs ENG 2nd T20I Live Updates : टीम इंडियाची गाडी घसरली, ३४ वर्षीय गोलंदाजांनी वाट लावली; रवींद्र जडेजाने सर्वाधिक धावा करून लाज वाचवली 

ग्लीसनने ४-१-१५-३ अशी कामगिरी केली, तर जॉर्डनने ४-०-२७-४ अशी सुरेख कामगिरी करताना भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली नाही. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 8:43 PM

Open in App

India vs England 2nd T20I Live Updates : नोव्हेंबर २०२१मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करणाऱ्या रिचर्ड ग्लीसन ( Richard Gleeson) याने जुलै २०२२मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानेच टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले. ग्लीसनने ४-१-१५-३ अशी कामगिरी केली, तर जॉर्डनने ४-०-२७-४ अशी सुरेख कामगिरी करताना भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली नाही. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 

रोहित शर्मा व रिषभ यांनी पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षकांना असलेल्या मर्यादेचा फायदा उचलताना उत्तुंग फटके मारले. या दोघांनी ४९ धावांची भागीदारी केली. पाचव्या षटकात पदार्पणवीर ग्लीसनने रोहितला बाद केले. यष्टिरक्षक जोस बटलरने ( Jos Buttler) परतीचा भन्नाट कॅच घेतला. रोहित २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर सातव्या षटकात विराटला ( १) धावांवर माघारी पाठवले आणि पुढच्याच चेंडूवर रिषभची विकेट घेतली. डेवीड मलानने विराटचा अप्रतिम झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर रिषभ बटलरकरवी झेलबाद झाला. रिषभने १५ चेंडूंत २६ धावा केल्या. 

ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवही ( १५) झेलबाद झाला अन् भारताला ८९ धावांवर चौथा धक्का बसला. पुढच्याच चेंडूवर हार्दिक ( १२) बॅकवर्ड पॉईंटला मलानच्या हाती झेलबाद झाला.  बिनबाद ४९ अशा अवस्थेतून भारतीय संघ ५ बाद ८९ धावा अशा संकटात सापडला. रवींद्र जडेजा व दिनेश कार्तिक यांनी टीम इंडियाचा डाव सावरताना ३३ धावांची भागीदारी केली, परंतु जोस बटलरने अनपेक्षितरित्या ही भागीदारी संपुष्टात आणली.

१६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात कार्तिक ( १२)  धावबाद झाला. बटलरने चतुराईने त्याला बाद केले. हर्षल पटेलने जडेजासह झटपट धावा करण्याचा प्रयत्न केला, परंतु जॉर्डनला षटकार खेचल्यानंतर पुढच्याच चेंडूवर हर्षल ( १३) बाद झाला. जडेजा अखेरपर्यंत खिंड लढवत राहिला. त्याने २९ चेंडूंत नाबाद ४६ धावा केल्या आणि भारताला ८ बाद १७० धावांपर्यंत नेले. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवींद्र जडेजारोहित शर्मा
Open in App